मुंबई : पुढचे ४८ तास राज्यातील काही भागांमध्ये विजांच्या कडकडाटासह मुसळधार पाऊस (rainfall ) पडेल असा इशारा हवामान विभागाकडून देण्यात आला आहे. मागील काही दिवसांपासून राज्यातील वातावरण ढगाळ आहे. त्यामुळे पुन्हा पाऊसाची दाट शक्यता आहे.
११ ते १५ डिसेंबर दरम्यान मुंबई, ठाणे, नवी मुंबई, उपनगर, पालघर, रायगड, सिंधुदुर्ग इथे रिमझिम पाऊस पडण्याची शक्यता आहे. तर १३ ते १५ डिसेंबर दरम्यान पुन्हा रिमझिम पाऊस आणि ढगाळ वातावरण राहणार आहे.