वाडेगांव :- (डॉ . शेख चांद) बाळापूर तालुक्यातील क्वारंटाईन सेंटर मध्ये सुविधांचा अभाव असल्याच्या धक्कादायक प्रकार समोर आला आहे यामध्ये कोरोना बाधीत रुग्ण बाळापूर तालुक्यात उच्चांक गाठत असताना कोरोन बाघीत रूग्णांच्या संपर्का मधे आलेल्या नागरिका साठी बाळापूर तालुक्यातील शेळद येथे कॉरंटाईन सेंटरची व्यवस्था करण्यात आली आहे तर यामध्ये क्वारंटाईन करण्यात आलेल्या नागरिकांना दुषीत पाणी पुरवठा होत असुन स्वच्छता गृहा मध्ये पाणी नसल्याचा गंभीर प्रकार समोर ऐत आहे तसेच पाण्या मध्ये जिव जंतू दिसत असल्यामुळे क्वारंटाईन करण्यात आलेल्या नागरिकाच्या आरोग्याचा प्रश्न ऐरणीवर आला आहे त्यामुळे संमनधीत विभाग यांच्या कडून सदर गंभीर समस्येकडे गांभीर्याने पाहिले जाते का अशा प्रश्न उपस्थित केल्या जात असुन संबधीत अधिकारी, लोकप्रतिनिधी यांनी याकडे लक्ष देण्याची मागणी होत आहे










