अकोट(देवानंद खिरकर) – अकोट तालुक्यातील दहीहांडा पोलीस स्टेशन अंतर्गत येत असलेल्या देवरी शेत शिवारात गोपनीय माहीती मिळाल्यावरुन सुरु असलेल्या जुगार अड्यावर दहीहांडा पोलीसांनी व उपविभागीय पोलीस अधिकारी यांच्या पथकांनी सापडा रचुन धाड टाकली या धाडी मध्ये 14,240 रुपयेचा मुद्देमाल जप्त करण्यात आला असुन 9 आरोपींन विरुध्द गुन्हा दाखल करण्यात आला आहे.पुढील कारवाई उपविभागीय पोलीस अधिकारी सुनिल सोनवणे, दहिहंडा ठाणेदार प्रेमानंद कात्रे यांच्या मार्गदर्शनाखाली पो.कर्मचारी प्रशांत उज्जेनकर,हर्षद देशमुख,दयाराम राठोड,सुभाष वाघ,गजानन पांतोड हे करीत आहेत.










