वाडेगांव ( डॉ. शेख चांद)-
वाडेगांव येथे दिनांक 9 सप्टेंबर रोजी पहाटे अंदाजे 2 ते 3 च्या दरम्यान वाडेगांव बाळापूर रोड वरील हायवेच्या पुला जवळील धनोकार यांच्या जागेत उभे असलेले नितीन मानकर यांच्या दोन टिपर त्या मध्ये एक नवीन टिप्पर आहे चे 6 टायर डिक्स सह व दोन्ही टिप्पर मधील डिजेल असे अंदाजे दोन लाखाचे सामन चोरुन नेल्याची घटना घडली आहे ज्या ठिकानी चोरी झाली ते ठिकान पोलीस चौकी पासून १ मिंटाच्या अंतरा वर आहे. या आठवडयात ही दुसरी घटना आहे या पुर्वी १ सप्टेंबर रोजी पहाटे वाडेगांव येथील शिक्षक व पुत्राला महारहान करून लुटन्याचा प्रयत्न धनेगांव ते बटवाडी फाट्या दरम्यान झाला होता . दिवसेन दिवस चोरी व लुटमारीच्या घटना वाढत असून या कडे पोलीस प्रशासन लक्ष देणार का ? अशी चर्चा जनतेत आहे. माहिती लियेपर्यंत गुन्हा दाखल करण्याची प्रक्रीया सुरू होती