कोरोना अलर्ट
आज बुधवार दि. ९ सप्टेंबर २०२० रोजी सकाळी प्राप्त अहवालानुसार,
प्राप्त अहवाल-३६५
पॉझिटीव्ह- ८८
निगेटीव्ह-२७७
अतिरिक्त माहिती
आज सकाळी ८८ जणांचे अहवाल पॉझिटीव्ह आले. त्यात ३२ महिला व ५६ पुरुषांचा समावेश आहे. त्यातील म्हैसांग व डाबकी रोड येथील प्रत्येकी आठ जण, जीएमसी येथील सात जण, कटयार, खदान व तांदळी बु. ता. पातूर येथील चार जण, लहान उमरी, सिंधे कॅम्प, मोठी उमरी, गौरक्षण रोड येथील प्रत्येकी तीन जण, मलकापूर, जठारपेठ, पोलिस स्टेशन चन्नी, कौलखेड, रजपूतपुरा ता. बाळापूर, रेणूका नगर व बाळापूर येथील प्रत्येकी दोन जण, तर उर्वरित पिंपरगाव छाब्रे ता. बार्शिटाकळी, परसोबढे, खेडा, गिता नगर, संत नगर, रणपिसे नगर, कुबेर नगर, गीता नगर, रेल्वे पोलिस, मालीपूरा, वाखना वाघ, पिंपरी ता.अकोट, खेतान नगर, दिगरस ता. पातूर, अकोट फैल, खापरवाडा, वाडेगाव ता.बाळापूर, जूने शहर, केशवनगर, मलकापूर, निमवाडी, तापडीया नगर, पिंजर, तेल्हारा, शास्रीनेनगर, मुर्तिजापूर व बेलूरा (खु.) येथील प्रत्येकी एक याप्रमाणे रहिवासी आहेत.
दरम्यान आज तीन जणांचे मृत्यू झाले. त्यात अकोट फैल, अकोला येथील ६६ वर्षीय पुरुष असून तो दि. ६ सप्टेंबर रोजी दाखल झाला होता. त्याचा उपचार घेताना मृत्यू झाला, गणेश नगर डाबकी रोड, अकोला येथील ८४ वर्षीय पुरुष असून तो दि. ३ सप्टेंबर रोजी दाखल झाला होता.त्याचा उपचार घेताना मृत्यू झाला. तर बाळापूर येथील ५५ वर्षीय पुरुष असून तो दि. ३१ ऑगस्ट रोजी दाखल झाला. त्याचा उपचार घेताना मृत्यू झाला.
दरम्यान काल रात्री रॅपिड ॲन्टीजेन टेस्टच्या अहवालात २६ जणांचे अहवाल पॉझिटीव्ह आले आहेत. त्यांचाही समावेश आजच्या पॉझिटीव्ह अहवाल संख्येत व ॲक्टीव्ह पॉझिटीव्ह अहवाल संख्येत करण्यात आला आहे, याची कृपया नोंद घ्यावी.
आता सद्यस्थिती
एकूण पॉझिटीव्ह अहवाल- ३९५९+८३५+१२९=४९२३
मयत-१७१
डिस्चार्ज- ३६२८
दाखल रुग्ण (ॲक्टीव्ह पॉझिटीव्ह)-११२४
(शासकीय वैद्यकीय महाविद्यालयाकडून प्राप्त माहितीनुसार)
घरीच रहा, सुरक्षित रहा!