मूर्तीजापुर (सुमित सोनोने)- मुर्तीजापुर नगर परिषदेचे अपक्ष निवडून आलेले नगरसेवक सुनिल पवार यांची जिल्हाध्यक्ष पदावर नियुक्ती करण्यात आली आहे.नगरसेवक सुनील पवार दुसऱ्यांदा नगरसेवक यांच्या भूमिकेत जनसेवा करत आहे या कार्याची दखल घेत यांची नगरसेवक परिषद मुंबई महाराष्ट्राच्या अकोला जिल्हाध्यक्षपदी यांची नियुक्ती करण्यात आली आहे.
सदर नियुक्ती संस्थापक-अध्यक्ष श्री राम जगदाळे तर प्रदेश सरचिटणीस डॉक्टर कैलास गोरे पाटील यांनी केली आहे संपूर्ण महाराष्ट्रात जिल्ह्यात नियुक्तया करण्यात येत आहे नगरसेवक नगरपरिषद मुबई महाराष्ट्र संघटनेचे मुख्य कार्य नगरसेवकांना प्रशासकीय स्तरावर येणाऱ्या समस्याचे निराकारण करणे महाराष्ट्र शासनाकडून नगर सेवकांच्या मौखिक हक्कासाठी पुढाकार घेऊन नगरसेवकांना हक्क मिळवून देणे अशा विविध समस्या नगरसेवक व नगर परिषद मधील समस्या निवारणाचे कार्य या संघटनेच्या मार्फत होणार आहे. तसेच जिल्हा कार्यकारणी जिल्हास्तरा वरील पदांच्या नियुक्त्या लवकरच करण्यात येणार असल्याची माहिती सुध्दा नगरसेवक सुनिल पवार यांनी दिली आहे माजी आमदार ॲड.भैयासाहेब तिडके,श्रीकृष्ण बोळे,सचिन देशमुख,अशोक अरोरा,कमलाकर गावंडे, राम कोरडे,अमर ठाकरे,जगदीश मारोटकर, संजय राऊत, सतीश आळे,यांनी सुनिल पवार यांचे कौतुक केले