पुणे : केरळमधील कोझिकोड विमानतळावर लँडिंग करताना धावपट्टीवरून एअर इंडियाचे विमान घसरून अपघातात झाला. या अपघातात मृत्यू झालेले मराठी वैमानिक (पायलट) कॅप्टन दीपक साठे हे भारतीय वायू दलातील निवृत्त अधिकारी होते. ते खडकवासला येथील राष्ट्रीय संरक्षण प्रबोधिनी (एनडीए ) चे माजी विद्यार्थी होत.
सध्या मुंबईतील जलवायू विहार ,पवई येथे स्थायिक असलेले कॅप्टन दीपक साठे हे एनडीएतून पास आउट झाल्यावर 1981 ला ते भारतीय वायुदलात रुजू झाले.सण 2003 साली वायुदलातून 22 वर्ष सेवा देऊन स्क्वाड्रन लीडर म्हणून निवृत्त झाले होते. त्यानंतर ते एअर इंडिया मध्ये वैमानिक म्हणून कार्यरत होते.
निवृत्त झाल्यावर ते व्यायासाईक विमान उड्डाण करायचे. त्यांच्या पाठीशी भारतीय वायू दलातील विमान उड्डाणाचा अनुभव होता. त्यांना बोइंग 737 सारख्या विमानांच्या उड्डाणाचा अनुभव होता. एनडीए त असताना त्यांना ‘प्रेसिडेंट गोल्ड मेडल’ ने सन्मानित करण्यात आले होते. एनडीए पश्चात एअर फोर्स अकॅडमी 127 पायलटच्या पासिंग आउट परेडमध्ये त्यांना ‘स्वोर्ड ऑफ ऑनर’ ने सन्मानित करण्यात आले होते