अकोला,दि.९-आज दिवसभरात (सायंकाळी पाच वाजेपर्यंत) कोरोना संसर्ग तपासणीचे ४१८ अहवाल प्राप्त झाले. त्यातील ३८७ अहवाल निगेटीव्ह तर ३१ अहवाल पॉझिटीव्ह आले. आता अकोला जिल्ह्यात पॉझिटीव्ह अहवालांची एकूण संख्या १८२८(१८०७+२१) झाली आहे. आज दिवसभरात २५ रुग्ण बरे होऊन घरी गेले. आजअखेर ३६८ पॉझिटीव्ह रुग्ण उपचार घेत आहेत,अशी माहिती शासकीय वैद्यकीय महाविद्यालय सूत्रांनी दिली आहे.
शासकीय वैद्यकीय महाविद्यालयाकडून प्राप्त माहितीनुसार आजपर्यंत एकूण १३६७६ जणांचे नमुने पाठवण्यात आले आहेत. त्यात प्राथमिक तपासणीचे १३२५७, फेरतपासणीचे १५७ तर वैद्यकीय कर्मचाऱ्यांचे २६२ नमुने होते. आजपर्यंत एकूण १३५३५ अहवाल प्राप्त झाले आहेत. एकूण निगेटीव्ह अहवालांची संख्या ११७२८ आहे. तर पॉझिटीव्ह अहवाल १८२८ (१८०७+२१)आहेत,अशी माहिती शासकीय वैद्यकीय महाविद्यालयाच्या सूत्रांनी दिली आहे.
आज ३१ पॉझिटिव्ह
आज दिवसभरात ३१ जणांचे अहवाल पॉझिटीव्ह आले. सकाळी २५ जणांचे अहवाल पॉझिटीव्ह आले. त्यात सहा महिला व १९ पुरुषांचा समावेश आहे. त्यातील सहा जण अकोट येथील, पाच जण बाळापूर येथील,तीन जण महान येथील,तीन जण खोलेश्वर येथील, दोन जण चांदूर येथील तर उर्वरीत हिंगणा पारस, रजपूतपूरा, मलकापूर(अकोला), कोठारीवाटिका मलकापूर रोड,खडकी व शिवनी येथील प्रत्येकी एक याप्रमाणे रहिवासी आहेत. तर सायंकाळी प्राप्त अहवालात सहा जणांचे अहवाल पॉझिटीव्ह आले आहेत. त्यात दोन महिला व चार पुरुष आहेत. त्यात दोन जण बोरगाव मंजू, दोन जण आदर्श कॉलनी तर तेल्हारा व अकोट येथील प्रत्येकी एक याप्रमाणे रहिवासी आहेत,अशी माहिती शासकीय वैद्यकीय महाविद्यालय येथून देण्यात आली.
२५ जणांना डिस्चार्ज
दरम्यान आज दिवसभरात शासकीय वैद्यकीय महाविद्यालयातून आठ तर कोविड केअर सेंटर मधून १७ अशा २५ जणांना डिस्चार्ज देण्यात आला. कोविड केअर सेंटर मधून डिस्चार्ज देण्यात आलेल्या तिघे डाबकी रोड येथील, तिघे गुलजार पुरा येथील, दोन जण खदान येथील, तर उर्वरित जयंत चौक, अकोट फैल, आलसी प्लॉट, तारफैल, शिवाजीनगर, ज्ञानेश्वर नगर, मोठी उमरी, हातरुण व गणेशनगर येथील प्रत्येकी एक या प्रमाणे रहिवासी आहेत,अशी माहिती कोविड केअर सेंटर येथून देण्यात आली. तर शासकीय वैद्यकीय महाविद्यालयातून डिस्चार्ज दिलेल्या आठ जणांपैकी प्रत्येकी मोठी उमरी, पातूर, बार्शी टाकळी, तेल्हारा, अकोट फैल, अकोट, गोरक्षण रोड व कैलास नगर येथील रहिवासी आहेत, अशी माहिती शासकीय वैद्यकीय महाविद्यालय व कोविड केअर सेंटर येथून देण्यात आली.
३६८ पॉझिटीव्ह रुग्णांवर उपचार सुरु
आजपर्यंत एकूण १८२८ (१८०७+२१) पॉझिटीव्ह अहवालांची संख्या आहे. त्यातील ९१ जण (एक आत्महत्या व ९० कोरोनामुळे) मयत आहेत. डिस्चार्ज दिलेल्या एकूण व्यक्तींची संख्या १३६९ आहे. तर सद्यस्थितीत ३६८ पॉझिटीव्ह रुग्ण उपचार घेत आहेत, अशी माहिती शासकीय वैद्यकीय महाविद्यालयाच्या सूत्रांनी दिली आहे.