मुर्तिजापूर (सुमित सोनोने):- तालुक्यातील लाखपुरी सह लाखपुरी सर्कल मधील शेतकरी वर्षभरापासुन तर काही शेतकरी ५ वर्षापासुन कृषी विभाग,जिल्हा प्रशासनाच्या पाय-या झिजवत आहेत.दुस-या वर्षातील खरीप पेरणीसुध्दा आटोपली.मात्र अजुनही मुग,कापुस,तुर,तीळ पिकांच्या पीक विम्याची रक्कम शेतक-यांना मिळाली नसुन,कृषी विभाग,जिल्हा प्रशासनाने आता तरी,शेतक-यांना न्याय मिळवुन द्यावा .असा सवाल लाखपुरी येथील शेतकरी प्रशासनाकडे करित आहे.
नैसर्गिक,अनैसगिक संकटांमुळे वर्षोगणती शेतकरी नुकसान सोसत असुन,प्रत्येक वेळी त्यांच्या पदरी निराशाच येत आहे. सातत्याने आर्थिक नुकसान होत असल्याने,शेतक-यांची आर्थिक स्थिती दिवसेंदिवस बिकट झाली आहे.या स्थितीतुन शेकतक-यांना सावरण्यासाठी व त्यांच्या पिकांला आर्थिक संरक्षण देण्यासाठी प्रधानमंत्री पीक विमा योजना सरु करण्यात आली आहे. मात्र योग्य वेळी नुकसानाच्या प्रमाणात शेतक-यांना पिक विम्याची रक्कम मिळत नसल्याने,योजनेचा हेतु साध्य होतांना दिसत नाही. हक्कांची पिक विम्याची रक्कम मिळविण्यसाठी दरवर्षी शेतक-यांना कृषी विभाग,जिल्हा प्रशासन व विमा कंपनीच्या पाय-या झिजवाव्या लागत आहेत.मागील २०१९-२० च्या खरीप हंगामात अतिवृष्टी व अवकाळी पावसामुळे शेतक-यांचे प्रचंड नुकसान झाले. त्यामुळे लाखपुरी सह लाखपुरी सर्कल चे शेतकरी आर्थिक संकटात सापडला होता.आणि आता कोरोणा प्रादुर्भावामुळे शेतक-याचे कंबरडेच मोडले आहे असुन,शेतमाल विक्री सुध्दा कठीण झाल्याने,आर्थिक स्थिती बिकट झाली आहे. अशा स्थितीत पीक विम्याची रक्कम मिळणे आवश्यक होते.मात्र अजुनही लाखपुरी सह लाखपुरी सर्कलचे हजारो मुग,कापुस,तिळ उत्पादकांना विम्याच्या रकमेसाठी कृषी विभाग,जिल्हा प्रशासन विभाग व विमा कंपनीच्या पाय-या झिजवाव्या लागत आहे. शासन यावर काय कारवाई करते याकडे सर्वांचे लक्ष लागले आहे.
—-–———————-–——————————-
मुग,कापुस,तुर,तीळ पिकांच्या पीक विम्याची रक्कम शेतक-यांना मिळाली नसुन,कृषी विभाग,जिल्हा प्रशासनाने आता तरी, शेतक-यांना विम्याची मदत मिळवुन द्यावी अन्यथा लाखपुरी सर्कलच्या वतीने तिव्र आंदोलनाचा पवित्रा हाती घेण्यात येईल येईल…
सौ. मिनल चंद्रकात नवघरे (पं.स.सदस्या लाखपुरी)
———————————————————–
५ वर्षासुन पिक विमा काढत आहे.परंन्तु एकही विमा मिळाला नाही.प्रशासनाकडे अनेक तक्रारी केल्या परंन्तु काहीच झाले नाही.मुर्तिजापुर तालुक्यात विमा मिळत नाही.व ईतर तालुक्यात विमा मिळतो हा दुजाभाव कोण करीत आहे.सबधित विभागाने दुषीवर कठोर कारवाई करावी…
प्रकाश राजपुत –(लाखपुरी शेतकरी)










