• About
  • Advertise
  • Privacy & Policy
  • Contact
Tuesday, June 10, 2025
26 °c
Akola
24 ° Sun
26 ° Mon
Join Telegram
Join Whatsapp
Our Akola
  • मुख्यपृष्ठ
  • अकोला
  • ठळक बातम्या
  • राज्य
  • फिचर्ड
    • रूपगंध
    • लेखणी
    • अस्मिता
No Result
View All Result
  • मुख्यपृष्ठ
  • अकोला
  • ठळक बातम्या
  • राज्य
  • फिचर्ड
    • रूपगंध
    • लेखणी
    • अस्मिता
No Result
View All Result
Our Akola
No Result
View All Result
Home कोविड १९

५३ अहवाल प्राप्तः ११ पॉझिटीव्ह, नऊ डिस्चार्ज, दोन मयत

City Reporter by City Reporter
June 1, 2020
in कोविड १९
Reading Time: 1 min read
78 1
0
akola corona positive update report (1)
12
SHARES
562
VIEWS
FBWhatsappTelegram

अकोला,दि.३१ – आज दिवसभरात (सायंकाळी पाच वाजेपर्यंत)कोरोना संसर्ग तपासणीचे ५३अहवाल प्राप्त झाले. त्यातील ४२ अहवाल निगेटीव्ह तर ११ अहवाल पॉझिटीव्ह आले आहेत. आज दुपारनंतर  नऊ जणांना डिस्चार्ज देण्यात आला. त्यातल्या दोन जणांना घरी सोडण्यात आले तर उर्वरित सात जणांना संस्थागत अलगीकरणात निरीक्षणात ठेवण्यात आले आहे.  दरम्यान काल (दि.३०) रात्री दोन रुग्णांचा उपचारादरम्यान मृत्यू झाला आहे. आता अकोला जिल्ह्यात पॉझिटीव्ह अहवालांची एकूण संख्या ५८१ झाली आहे.  तर आजअखेर प्रत्यक्षात ११७ पॉझिटीव्ह रुग्ण उपचार घेत आहेत, अशी माहिती शासकीय वैद्यकीय महाविद्यालय सूत्रांनी दिली आहे.

 शासकीय वैद्यकीय महाविद्यालयाकडून प्राप्त माहितीनुसार, आजपर्यंत एकूण ५२८३ जणांचे नमुने पाठवण्यात आले आहेत. त्यात प्राथमिक तपासणीचे ५००९, फेरतपासणीचे ११० तर वैद्यकीय कर्मचाऱ्यांचे १६४ नमुने होते. आजपर्यंत एकूण ५२६० अहवाल प्राप्त झाले आहेत. त्यात प्राथमिक तपासणीचे ४९८६ तर फेरतपासणीचे ११० व वैद्यकीय कर्मचाऱ्यांचे १६४ अहवाल आहेत. एकूण निगेटीव्ह अहवालांची संख्या ४६७९ आहे. तर पॉझिटीव्ह अहवाल ५८१ आहेत. तर आजअखेर २३ नमुन्यांचे अहवाल प्रलंबित आहेत.

हेही वाचा

गर्दीच्या ठिकाणी मास्क वापरा : तज्ज्ञांकडून आवाहन

कोविड प्रतिबंधक उपाययोजना चाचण्यांचे प्रमाण वाढविले

आज ११ पॉझिटिव्ह

आज सकाळी प्राप्त अहवालात ११ जणांचे अहवाल पॉझिटीव्ह आले. त्यात पाच महिला व सहा पुरुष आहेत. त्यात  हरिहरपेठ येथील दोन, खदान, जी. वी. खदान, गायत्रीनगर कौलखेड रोड, गोडबोले प्लॉट,  फिरदौस कॉलनी, जुनेशहर,  तारफैल, जठारपेठ, सिंधी कॅम्प येथील रहिवासी आहेत.

आज सायंकाळच्या अहवालात एकही अहवाल पॉझिटीव्ह आला नाही.

दोघांचा मृत्यू

 दरम्यान काल रात्री दोन जण उपचार घेतांना मयत झाले आहेत. त्यात एक व्यक्ती संताजीनगर सुधीर कॉलनी सिव्हील लाईन येथील रहिवासी आहे. हा व्यक्ती  दि.२७ रोजी दाखल झाला होता. तर अन्य व्यक्ती बाळापुर येथील  असून हा व्यक्ती दि.२६ रोजी दाखल झाला होता. या दोघांचा काल रात्री उपचारा दरम्यान  मृत्यू झाला.

नऊ जणांना डिस्चार्ज

आज दुपारून नऊ जणांना डिस्चार्ज देण्यात आला. त्यातील सात जणांना संस्थागत अलगीकरणात निरीक्षणात ठेवण्यात आले तर अन्य दोघांना घरी सोडण्यात आले. त्यात चार महिला व पाच पुरुष असून ते गोकुळ कॉलनी, फिरदौस कॉलनी,  न्यू खेतान नगर कौलखेड, रेल्वे स्टेशन,  अशोक नगर अकोट फैल,  खदान, हरिहरपेठ, गायत्री नगर , मोहम्मद अली रोड येथील रहिवासी आहेत.

११७ पॉझिटीव्ह रुग्णांवर उपचार सुरु

आता सद्यस्थितीत ५८१  जणांचे अहवाल कोरोना पॉझिटीव्ह आहेत. त्यातील ३२ जण (एक आत्महत्या व ३१ कोरोनामुळे) मयत आहेत.  तर आज नऊ जणांना  डिस्चार्ज दिला आहे. आता डिस्चार्ज दिलेल्या  एकूण  व्यक्तींची संख्या ४३२  झाली आहे. तर सद्यस्थितीत ११७ पॉझिटीव्ह रुग्ण उपचार घेत आहेत. यापैकी तीन रुग्ण हे मुर्तिजापूर येथील उपजिल्हा रुग्णालयात दाखल आहेत तर एक जण कोविड केअर सेंटरला दाखल आहे. तर एका रुग्णाला नागपूर येथे संदर्भित करण्यात आले आहे, अशी माहिती शासकीय वैद्यकीय महाविद्यालयाच्या सूत्रांनी दिली आहे.

पाच प्रतिबंधित क्षेत्र व्यपगत

 कोरोना संसर्गित रुग्ण आढळल्यामुळे  प्रतिबंधित क्षेत्र म्हणून घोषित करण्यात आलेले पाच भागांचे प्रतिबंधित क्षेत्र म्हणून घोषित केलेले आदेश अकोला उपविभागीय दंडाधिकाऱ्यांनी व्यपगत केले आहेत. शंकरनगर, जयहिंद चौक, सिंधी कॅम्प, शिवनी व शिवर या पाच भागांचा त्यात समावेश आहे. गेल्या २८ दिवसांत तेथे नवीन रुग्ण न आढळल्याने हे प्रतिबंधित क्षेत्र व्यपगत केले आहेत, अशी माहिती जिल्हा प्रशासनाने दिली आहे.

Previous Post

अकोला सहाशेचा टप्पा पूर्ण करण्याच्या मार्गावर,११ पॉझिटिव्ह आढळले,तर दोघांचा मृत्यु

Next Post

सदैव समाजभान जपणाऱ्या मनीष रामाभाऊ कराळे मित्रपरिवाराच्या वतीने हायजेनिक भव्य रक्तदान शिबिर संपन्न

RelatedPosts

अमेरिकेच्या ‘सेंटर्स फॉर डीसीज कंट्रोल अँड प्रिव्हेन्शन’ने मास्कबाबत दिली एक नवी माहिती
Corona Featured

गर्दीच्या ठिकाणी मास्क वापरा : तज्ज्ञांकडून आवाहन

January 3, 2024
कोरोना
Corona Featured

कोविड प्रतिबंधक उपाययोजना चाचण्यांचे प्रमाण वाढविले

January 3, 2024
चीनने शत्रुराष्ट्रांमध्ये मुद्दाम कोरोना पसरवला
Corona Featured

चिंता वा़ढली : देशात कोविड जेएन.१ ची रूग्णसंख्या १०९ वर आणि गुजरात मध्ये सर्वाधिक

December 27, 2023
कोरोनाच्या नवीन स्ट्रेनपासून बचाव करण्यासाठी मास्कचा असा वापर करा ,CDSच्या तज्ज्ञांनी दिली माहिती
Featured

कोरोनाच्या JN.1 व्हेरिएंटचा धोका ! देशभरात नवे ६३ रूग्ण गोव्यात सर्वाधिक

December 25, 2023
अकोला जिल्ह्यात कोरोनाचा कहर सुरुच, 281 पॉझिटीव्ह, 154 डिस्चार्ज, आठ मृत्यू
Featured

जिल्ह्यात आज दोन कोरोना पॉझिटीव्ह

May 17, 2023
अकोला जिल्ह्यात कोरोनाचा कहर सुरुच, 281 पॉझिटीव्ह, 154 डिस्चार्ज, आठ मृत्यू
Featured

आज जिल्ह्यात एक कोरोना पॉझिटीव्ह

May 9, 2023
Next Post
manish karale

सदैव समाजभान जपणाऱ्या मनीष रामाभाऊ कराळे मित्रपरिवाराच्या वतीने हायजेनिक भव्य रक्तदान शिबिर संपन्न

Akola Railway

आजपासून अकोला रेल्वे स्थानकावरून सुरू रेल्वे गाड्या

आपली प्रतिक्रियाCancel reply

Stay Connected

  • 348 Followers
  • 281 Followers
  • 2.4k Subscribers

हेही वाचा

No Content Available
Load More
Our Akola

बातमी आमची विश्वास तुमचा
लिहताय ? आपले लेख/ लिखाण अवर अकोला वर पाठवण्यासाठी आम्हाला आपल्या नावासहित इमेल करा - [email protected]

Follow Us

  • मुख्यपृष्ठ
  • अकोला
  • ठळक बातम्या
  • राज्य
  • फिचर्ड

© 2021 Ourakola - Managed by Fusion Technologies.

Welcome Back!

Login to your account below

Forgotten Password?

Retrieve your password

Please enter your username or email address to reset your password.

Log In
व्हॉट्सअ‍ॅप/ टेलिग्राम वर Subscribe करा

व्हॉट्सअ‍ॅपवर बातम्या मिळवण्याकरीता खालील लिंकवर
क्लिक करून व्हॉट्सअ‍ॅप ग्रुप जॅाईन करा.

 

टेलिग्राम Channel – https://t.me/ourakola

Whatsapp Channel – https://whatsapp.com/channel/0029VaCzRDc7YSdD90dbun2v


Twitter – https://twitter.com/ourakola
Facebook – https://www.facebook.com/OurAkolaMedia/
Youtube –  https://www.youtube.com/c/OurMediaNetworks

No Result
View All Result
  • मुख्यपृष्ठ
  • अकोला
  • ठळक बातम्या
  • राज्य
  • फिचर्ड
    • रूपगंध
    • लेखणी
    • अस्मिता

© 2021 Ourakola - Managed by Fusion Technologies.