तेल्हारा ( परमेश्वर इंगळे )- संपूर्ण तेल्हारा तालुक्यात गाजत असलेल्या पंचायत समिती आवारातील भाजीपाला मार्केट मधील आंबा प्रकरणात तेल्हारा परिसरातील जनतेला दिलासा देणारी बातमी नुकतीच हाती आली आहे.
सविस्तर बातमी अशी आहे की आंध्रप्रदेश मधुन महाराष्ट्रात आंबे घेऊन आलेल्या ट्रक च्या ड्रायव्हर ला कोरोनाची लागण असल्याचे प्रशासनाने स्पष्ट केल्याने महाराष्ट्रात जीथं जीथं या ट्रक मधुन आंबे उतरवली गेली तेथील प्रशासन खळबळुन गेले.आणि सबंधित ट्रक ड्रायव्हर च्या संपर्कात येणार्या सर्वांची चाचणी केल्या गेली असता या संपर्कातील सर्वांचे वैद्यकीय चाचण्यांचा निकाल हा नेगेटिव्ह आला असुन सर्वांनी सुटकेचा निस्वास टाकला आणि परिसरातील जनतेला खुप मोठा दिलासा मिळाला असुन यापुढे प्रशासनाने दक्ष राहुन पावले उचलण्याची जनतेत चर्चा आहे.