अडगाव (प्रतिनिधी शिवा मगर ): गुरवार दिनांक 16/04/2020 अडगाव बु. पोहेकाँ. पांडुरंग राऊत व पोकाँ. निलेश खंडारे पोलीस चौकी येथे हजर असताना बातमीदाराने बातमी दिली की ,अब्दुल शाहरूख अब्दुल शहीद रा अडगाव बु हा त्याचे राहत्या घराच्या बाजुला त्यांच्यां नविन बांधकाम करीत असलेल्या घरात गोवंशाची कत्तल करून मांसाची विक्री करीत असलेल्या बाबतची माहिती मिळाली. सदरची माहीती मा. ठाणेदार यांना फोन द्वारे देवून व त्यांचे मार्गदर्शनाप्रमाणे पंचानाम्यातील नमुद दोन पंचाना पोलीस चौकी अडगांव बु.येथे बोलावून त्यांना बातमीची माहीती दिली व पंच म्हणून सोबत हजर राहण्यास सांगितले. पोउपनी विठ्ठल वाणी ,पोकॉ.निलेश खंडारे ब.नं.2001व पचं असे मिळालेल्या बातमी प्रमाणे शिवाजी नगर झोपडपटटीमधे राहणार्या अब्दुल शाहरूख अब्दुल शहीद याचे घरी गेलो असता त्याचे राहते घराचे दक्षिणेस चालु असलेल्या त्याचे नविन बांधकाम करीत असलेल्या त्याचे नविन बांधकाम करीत असलेल्या घरी गेलो असता सदर घराचे अर्धवट बांधकाम सुरु असून सदर बांधकाम चालू असलेल्या घरामध्ये एक इसम मिळून आला त्यास पंचासमक्ष नाव गाव विचारले असता त्याने त्याचे नाव अब्दुल शाहरूख अब्दुल शहीद वय 22 वर्ष रा. शिवाजीनगर झोपडपटटी अडगांव बु ता. तेल्हारा.असे सांगीतले. सदर घरामधे पंचासमक्ष पाहणी केली असता घरामधे जमिनीवर गोवंश मांसाचे तुकडे,हाडे,पायाची खुरे, आतडे,गोवंशाचे चामडी नसलेले मुंडके व लाल रंगाचे गोवंशाची चामडी असे एकूण अंदाजे 60किलो वजनाचे गोवंश मांसाचे कत्तल केलेले तुकडे किंमत अंदाजे 12,000रूपये व गोवंश मांसाजवळ दोन लोखंडी सुर्या किंमत अंदाजे 1000रु असा एकुण 12,100रु किंमतीचा मुद्देमाल मिळून आल्याने पोउपनि विठ्ठल वाणी यांणी सदरचे गोवंश मांस व गोंवश कत्तली करीता वापरण्यात आलेल्या दोन सुर्या पंचासमक्ष जप्त केल्या. सदरचा पंचनामा कार्यवाही 08/30व ते09/30वा दरम्याण करण्यात आली सदर गुन्हयातील विषयात नमुद आरोपी यांचे हे कृत्य 429,34भादवी सहकलम 5,5(क)9,9(अ)महा.प्रा.सं.अधीनीयम अन्वये गुन्हा नोंदविला आहे सदर कारवाई ठाणेदार यांच्या मार्गदर्शनाखाली, पांडुरंग राऊत ,निलेश खंडारे यांनी केली