वाडेगाव (पंकज इंगळे ): भारतीय घटनेचे शिल्पकार महामानव डॉ बाबासाहेब आंबेडकर यांची जयंती मोठ्या भावपूर्ण वातावरणात साजरी करण्यात आली यामध्ये भारतीय कॉंग्रेस पक्षाचे अकोला जिल्हा उपाध्यक्ष तथा ग्रामपंचायत सदस्य प्रमोद डोंगरे यांनी कोरोना व्हायरस संसर्ग मुळे लागु असलेल्या संचारबंदी मुळे सालाबादप्रमाणे कुठलाही सामाजिक उपक्रम डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या जयंती निमित्ताने न करता घरातील सदस्य समवेत डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या प्रतीमेला पुष्प हार अर्पण करून अभिवादन केले. त्यावेळी ग्रामपंचायत सदस्या अनिता डोंगरे प्रेरना डोंगरे तसेच भिमसेना संघटनेचे भुषण डोंगरे उपस्थित असुन त्रिशरन पंचशील घेतले.