तेल्हारा(किशोर डांबरे)- कोरोनाने देशात माजवलीला कहर आणि त्यामुळे देशात कोरोना बधितांच्या उपचारासाठी तसेच त्यांच्या मदतीकरिता पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी देशातील जनतेला मदत करण्याचे आवाहन केले त्या आवाहनाला स्वीकारत तेल्हारा येथील किराणा व्यावसायिकाने चक्क एक लाख एक हजार रुपयांची मदत पंतप्रधान मदत केंद्राला पाठवली.
कोरोनाने देशात अनेक जणांना आपल्या विळख्यात ओढवले असून अनेक जण यामुळे बेघर तसेच रोजगार हरवून बसले तर काहींवर उपासमारीची वेळ आली आहे.अशातच पंतप्रधान यांनी देशातील जनतेला मदत करण्याचे आवाहन केले होते त्याला अनेक जणांनी मदतीचा हात दिला असून तेल्हारा येथील किराणा व्यवसायिक आनंद किराणाचे संचालक अरुण अकोटकर यांनी पंतप्रधान मदत केंद्राला आज दि ३० मार्च रोजी *एक लाख एक हजाराची मदत पाठवली.तेल्हारा शहरातून एवढी मोठी रक्कम पाठवणारे अकोटकर हे पहिले असून त्यांच्या या माणुसकीला तेल्हारावासी दुजोरा देत आहेत