तेल्हारा (विशाल नांदोकार)- आजच्या युवकांवर बेजबाबदारपणाचा अनेक वेळा आरोप केला जातो. तसा काहीसा प्रवादही समाजात आहे. मात्र, या प्रवादाला छेद देत तेल्हाऱ्यातील जय बजरंग मंडळातील काही युवक गरजूंची भूक भागवीत आहेत जगात सर्वत्र कोरोनामुळे हाहाकार माजलेला असून सर्वत्र लॉक डाऊन असल्याने गोरगरिबांना भूक भागविण्याचा मोठा प्रश्न उद्भवला आहे यातच या युवकांनी हा विधायक उपक्रम राबवून समाजासमोर गोरगरिबांना अन्न देण्यासाठी विनवणी करीत आहेत.
कोरोना व्हायरसच्या जगव्यापी साथीने प्रगत देशांना हतबल केले आहे. सर्वतोपरी प्रयत्न करूनही आव्हाने वाढत आहेत. पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी मंगळवारी मध्यरात्रीपासून देशभरात 21 दिवस संपूर्ण ‘लॉकडाऊन’ लागू करण्यात येत असल्याची घोषणा केली. जगभरात भीतीचे वातावरण निर्माण करणाऱ्या कोरोनामुळे आतापर्यत 27,370 हून अधिक लोकांना आपला जीव गमवावा लागला आहे. तर 5,97,458 लोकांना त्याचा संसर्ग झाल्याची माहिती मिळत आहे. तर 1,33,373 लोक बरे झाल्याची माहिती मिळत आहे.
तेल्हाऱ्यातील “जय बजरंग मंडळाचे युवक हे कोणत्या ना कोणत्या क्षेत्रात मोल मजुरी किंवा शिक्षण घेत आहेत. हे काम करत असताना त्यांनी सामाजिक बांधिलकीही जपली आहे. आज रोजी कोरोना व्हायरस सर्वत्र हाहाकार माजवत असून सर्व देशात लॉक डाऊन जन्य परिस्थिती निर्माण झाली आहे. यामुळे बाहेरगाव वरून शहरात मोलमजुरी करून आलेले कामगार आपली राहोटी टाकून गावाच्या बाहेर वसलेले आहेत. नियमित ते मोलमजुरी करून आपले व परिवाराचे पोट भरत असतात परंतु आजरोजी लॉकडाऊनमु;ळे त्यांना घराबाहेत निघता येत नाही त्यामुळे त्यांच्यासह त्यांच्या कुटुंबावर उपासमारीची वेळ आली आहे. त्यामुळे त्यांना जेवण म्हणून जय बजरंग मंडळाचे युवक रोज त्यांची भूक भागवीत आहेत, यावेळी जय बजरंग मंडळाच्या युवकांनी आज सर्वत्र कर्फ्यूजन्य परीस्थितीत कोण्या भुकेल्याची जर आप्नाद्वारे भूक भागविल्या जात असेल तर हे काम आपण अवश्य करा अशी विनवणी केली आहे.