वाडेगाव(डॉ शेख चांद)- छत्रपती शिवाजी महाराज हे महाराष्ट्राचे दैवत असून कोण्या नेत्यांनी शिवरायांशी तुलना करणे म्हणजे छत्रपती शिवाजी महाराजांचा तसेच महाराष्ट्र धर्माचा अपमान आहे त्यामुळे मावळ्यांनी छत्रपती शिवाजी महाराजांचा अपमान सहन करू नये असे प्रतिपादन शिवव्याख्याते अमोलदादा मिटकरी यांनी केले.
वाडेगाव येथे श्री जागेश्वर कोचिंग क्लासच्या वतीने आयोजित छत्रपती संभाजी महाराज राज्याभिषेक दिन व गुणवंत विद्यार्थ्यांचा सत्कार समारंभाच्या वेळी” गर्जा महाराष्ट्र माझा” या कार्यक्रमामध्ये ते बोलत होते.
यावेळी कार्यक्रमाचे अध्यक्ष श्रीमती सुमित्राबाई अंधारे कृषी महाविद्यालयाचे अध्यक्ष कृष्णाभाऊ अंधारे हे होते तर प्रमुख अतिथी म्हणून अस्थिरोग तज्ञ डॉ.अभयदादा पाटील, शेतकरी संघटनेचे मनोज तायडे, जगदीश मुरुमकार, शिक्षण प्रसारक मंडळाचे अध्यक्ष संतोष मानकर, सदस्य विश्वानाथ मानकर, राष्ट्रवादी काँग्रेसचे तालुकाध्यक्ष शिवाजी म्हैसने, बाळापूर पंचायत समितीचे उपसभापती धनंजय दांदळे, मनोहर मानकर, अविनाश नाकट, डोंगरे गुरुजी, प्रा.नितीन मानकर आदी मान्यवर उपस्थित होते.
कार्यक्रमात प्रथम छत्रपती संभाजी महाराजांच्या पुतळ्याचे पूजन करून हारार्पण करण्यात आले त्यानंतर मान्यवरांच्या हस्ते गुणवंत विद्यार्थ्यांचा सन्मानचित्र व प्रशस्तीपत्र देऊन गुणगौरव करण्यात आला यावेळी श्री जागेश्वर कोचिंग क्लासचे संचालक नितीन मानकर यांनी प्रास्ताविकाने कार्यक्रमाची सुरुवात केली.
जगात ज्ञानाशिवाय कोणीच मोठ नाही आपल्या घरात काही नसलं तरी चालेल पण पुस्तके असली पाहिजे तसेच विद्यार्थ्यांनी यशाचे शिखर गाठायचे असेल तर मेहनत जिद्द व चिकाटीची जोड असली पाहिजे असे उदगार डॉ. अभयदादा पाटील यांनी काढले तर वाडेगाव विदर्भाची बोर्डोली असून या गावात शिक्षकांची संख्या जास्त आहे विद्यार्थ्यांनी शिक्षण क्षेत्रात यशस्वी होऊन उज्ज्वल भविष्य घडविले पाहिजे असे कृष्णाभाऊ अंधारे यांनी अध्यक्षीय भाषणात सांगितले.
कार्यक्रमाला पंचक्रोशीतील नागरिक विद्यार्थी विद्यार्थ्यांची उपस्थिती होती कार्यक्रमाचे संचालन राजेश ताले यांनी तर शिवाजी म्हैसने यांनी आभार प्रदर्शन केले.
ताज्या घडामोडींसाठी अवर अकोला न्युज ला भेट द्या
जाहिरात व बातम्यांकरिता-9922390308
व्हॉट्सअॅपवर ताज्या घडामोडी मिळवण्यासाठी Subscribe करा
व्हॉट्सअॅपवर बातम्या मिळवण्याकरीता 9765123455 हा नंबर तुमच्या
मोबईलमध्ये अवर अकोला या नावाने सेव्ह करा आणि खालील लिंकवर
क्लिक करून व्हॉट्सअॅप ग्रुप जॅाईन करा.
https://chat.whatsapp.com/JCHDKTxXxij4HRgrZwmzu8