• About
  • Advertise
  • Privacy & Policy
  • Contact
Friday, March 27, 2026
26 °c
Akola
24 ° Sun
26 ° Mon
Join Telegram
Join Whatsapp
Our Akola
  • मुख्यपृष्ठ
  • अकोला
  • ठळक बातम्या
  • राज्य
  • फिचर्ड
    • रूपगंध
    • लेखणी
    • अस्मिता
No Result
View All Result
  • मुख्यपृष्ठ
  • अकोला
  • ठळक बातम्या
  • राज्य
  • फिचर्ड
    • रूपगंध
    • लेखणी
    • अस्मिता
No Result
View All Result
Our Akola
No Result
View All Result
Home Featured

मुख्यमंत्री ग्राम सडक योजनेला भ्रष्टाचाराने पोखरले?रस्त्यांची कामे अत्यंत निकृष्ट दर्जाची, लोकप्रतिनिधींच्या चुप्पीमुळे वेगवेगळे तर्कवितर्क!

adil by adil
May 27, 2020
in Featured, अकोला जिल्हा
Reading Time: 1 min read
84 0
0
मुख्यमंत्री ग्राम सडक योजनेला भ्रष्टाचाराने पोखरले?रस्त्यांची कामे अत्यंत निकृष्ट दर्जाची, लोकप्रतिनिधींच्या चुप्पीमुळे वेगवेगळे तर्कवितर्क!
12
SHARES
603
VIEWS
FBWhatsappTelegram

हिवरखेड(धीरज बजाज)- मुख्यमंत्री ग्राम सडक योजनेला भ्रष्टाचाराने पोखरले असल्याचे चित्र सर्वत्र दिसत असून संबंधित यंत्रणेचे हात ओले झाले असण्याची चर्चा नागरिकांमध्ये रंगली आहे. अत्यंत निकृष्ट कामानंतरही विकासप्रेमी लोकप्रतिनिधी मूग गिळून गप्प असल्याने नागरिकांकडून वेगवेगळे तर्कवितर्क लावले जात आहेत.

ग्रामीण भागाला पक्क्या दर्जेदार रस्त्यांनी जोडले जावे, दुर्गती झालेल्या रस्त्यांचे पुनर्जीवन करून सर्व खेड्या गावांना विकासगंगेशी जोडावे अशा उदात्त हेतूने मुख्यमंत्री ग्राम सडक योजनेवर करोडो अरबो रुपये शासन खर्च करत आहे. सध्या तेल्हारा तालुक्यात अनेक रस्त्यांची कामे या योजनेअंतर्गत होत असून हि कामे अत्यंत निकृष्ट दर्जाची होत आहेत. सोबतच अनेक अनियमितता निदर्शनास येत आहेत. हिवरखेड-सोनवाडी, गोर्धा-हिंगणी-दानापूर, बेलखेड-लोहारी, रायखेड- चांगलवाडी, दानापूर- वारखेड, तेल्हारा- गाडेगाव, हे यामध्ये प्रमुख उदाहरणे आहेत. काही चांगले अपवाद वगळता यापैकी अनेक रस्त्यांमध्ये वर्कऑर्डर कालावधी संपला तर काहीचा संपत आहे तरीही अनेक कामे अपूर्णच आहेत. आणि अनेक पुलांची कामे सुरूच झाली नाहीत. तर काही फक्त सुरुवातीच्या टप्प्यात आहेत. डांबरी रोड असतानाही पाण्यामुळे खराब होऊ नये म्हणून गावांतर्गत काँक्रीट रस्ते केले जातात. अनेक गावांमध्ये हे रस्ते सुरूच झाले नाहीत. आणि जे झाले त्यामध्ये कटिंग, ब्रेकिंग न केल्यामुळे उन्हाळ्यात मोठ्या प्रमाणात तडे मारण्याची शक्यता आहे.

हेही वाचा

तेल्हारा शहराजनिक भीषण अपघात ,तीन अल्पवयीन मुलांचा मृत्यू

शेगाव येथे राष्ट्रीय आरोग्य मेळावा राष्ट्रपतींच्या हस्ते शुभारंभ औषधी वनस्पतींचे संवर्धन ही लोकचळवळ व्हावी – राष्ट्रपती द्रौपदी मुर्मू

वर्कऑर्डर संपूनही काँक्रिटीकरणाची 80 ते 90 टक्के कामे प्रलंबित आहेत. गोर्धा-दानापुर रस्त्यावरील आस नदीवरील मोठ्या पुलाच्या फाउंडेशनच्या कामात दिवसाढवळ्या मातीचा मोठ्या प्रमाणात वापर होत असल्याने हा पूल किती दिवस टिकेल? असा प्रश्न निर्माण झाला आहे.

पूर्ण रस्त्याचे इस्टिमेट असतानाही एक किमी आधीचा रस्ता थोडा चांगला असल्याने एक किमी नवीन रस्ता न करता तसाच सोडून देण्याचा धक्कादायक प्रकार दिसत आहे. रस्त्यावरील पाणी योग्य दिशेने जावे म्हणून पाईप टाकले जातात त्याचा वापर जवळपास करण्यात आलाच नाही असा शेतकऱ्यांचा आरोप आहे. सर्वात महत्त्वाचे म्हणजे डांबरीकरणाच्या दोन्ही बाजूला प्रत्येकी दोन मीटरपर्यंत चार इंचाचे साईड शोल्डर प्रेसिंग करावे लागते ते साईड शोल्डर अनेक रस्त्यांवर अदृश्य आहेत. गोर्धा दानापूर रस्ता पूर्ण होण्याआधीच जेवढा झाला त्यापैकी 25 टक्के रस्ता खराब झाला आहे. रस्ता पूर्ण होण्याआधीच पॅचेस भरण्याची नामुष्की आली आहे.

हिवरखेड- सोनवाडी रस्त्याच्या चार-पाच पुलांचे काम वर्कऑर्डर संपूनही सुरूच केलेले नाहीत. बेलखेड-अकोली-लोहारी रोडची वर्कऑर्डर संपूनही पुलांचे काम, साईड शोल्डरचे काम, आणि इतरही अनेक कामे अपूर्णच आहेत. दानापूर-वारखेड या रस्त्याच्या सीलकोट मध्ये डांबराचे प्रमाण अत्यंत कमी वापरल्याने रस्ता टीकण्यासाठी सर्वात महत्त्वपूर्ण असलेला सीलकोट जवळपास पूर्णतः उखडलेला दिसत आहे. रस्त्याचा दर्जा किती निकृष्ट आहे हे लहान मुलेही सांगू शकतात. रस्त्यांच्या पुलाच्या प्रमाणात रस्त्याची उंची न मिळविल्याने पाणी प्रवाह बदलण्याची दाट शक्यता आहे. रस्त्यांची उंची पुलाच्या प्रमाणात मिळविण्यासाठीचे “मटेरियल” मोठ्या प्रमाणात वापरलेच नसल्याचे निदर्शनास येत आहे. सर्व रस्त्यांची कामे एवढी निकृष्ट असूनही ही कामे एकाच कंत्राटदाराकडे देण्याची विशेष मेहरबानी कोणाच्या इशाऱ्यावर करण्यात आली हा प्रश्न सुद्धा निर्माण होत आहे. ह्या निकृष्ट कामांना वरिष्ठ अधिकाऱ्यांचे अभयदान का आहे? आणि विकास प्रेमी लोकप्रतिनिधी या निकृष्ट कामांवर मूग गिळून गप्प कसे बसले? ह्याबाबत नागरिकांच्या मनामध्ये रोष असून लवकरच हा मुद्दा नवनियुक्त पालकमंत्री बच्चुभाऊ कडू यांच्या निदर्शनास आणण्यात येईल असे काही त्रस्त प्रवाश्यांनी सांगितले.

प्रतिक्रिया
रस्त्यांची कामे निकृष्ट असतील तर “त्या” कंत्राटदाराला कामे व्यवस्थित करायला सांगू डी. के. इंगळे, कार्यकारी अभियंता, मुख्यमंत्री ग्राम सडक योजना.

ताज्या घडामोडींसाठी अवर अकोला न्युज ला भेट द्या
??????????

जाहिरात व बातम्यांकरिता-9922390308

व्हॉट्सअ‍ॅपवर ताज्या घडामोडी मिळवण्यासाठी Subscribe करा
व्हॉट्सअ‍ॅपवर बातम्या मिळवण्याकरीता 9765123455 हा नंबर तुमच्या
मोबईलमध्ये अवर अकोला या नावाने सेव्ह करा आणि खालील लिंकवर
क्लिक करून व्हॉट्सअ‍ॅप ग्रुप जॅाईन करा.
https://chat.whatsapp.com/JCHDKTxXxij4HRgrZwmzu8

Tags: हिवरखेड
Previous Post

ब्रेकिंग-अडगाव अकोट रस्त्यावर चारचाकी ऑटोची समोरासमोर धडक, अनेक जण गंभीर जखमी

Next Post

शिवप्रेमींनी छत्रपतीचा अपमान सहन करू नये- अमोलदादा मिटकरी

RelatedPosts

तेल्हारा शहराजनिक भीषण अपघात ,तीन अल्पवयीन मुलांचा मृत्यू
अकोला जिल्हा

तेल्हारा शहराजनिक भीषण अपघात ,तीन अल्पवयीन मुलांचा मृत्यू

March 1, 2026
शेगाव येथे राष्ट्रीय आरोग्य मेळावा राष्ट्रपतींच्या हस्ते शुभारंभ औषधी वनस्पतींचे संवर्धन ही लोकचळवळ व्हावी – राष्ट्रपती द्रौपदी मुर्मू
Featured

शेगाव येथे राष्ट्रीय आरोग्य मेळावा राष्ट्रपतींच्या हस्ते शुभारंभ औषधी वनस्पतींचे संवर्धन ही लोकचळवळ व्हावी – राष्ट्रपती द्रौपदी मुर्मू

February 26, 2026
तेल्हारा पो स्टे अंतर्गत विवाहितेला लग्नाचे आमिष अश्लील व्हिडिओ ब्लॅकमेकिंग आणि आणि जीवे मारण्याची धमकी
Featured

तेल्हारा पो स्टे अंतर्गत विवाहितेला लग्नाचे आमिष अश्लील व्हिडिओ ब्लॅकमेकिंग आणि जीवे मारण्याची धमकी

February 17, 2026
टाऊन हॉल की ‘अवैद्य धंद्यांचा मॉल’…?
Featured

टाऊन हॉल की ‘अवैद्य धंद्यांचा मॉल’…?

February 17, 2026
मा. श्री नितीनजी गडकरी यांच्या हस्ते वर्ल्ड्स फर्स्ट टॉकिंग श्री गजानन विजय ग्रंथ’ च्या अधिकृत वेबसाईटचे लोकार्पण
Featured

मा. श्री नितीनजी गडकरी यांच्या हस्ते वर्ल्ड्स फर्स्ट टॉकिंग श्री गजानन विजय ग्रंथ’ च्या अधिकृत वेबसाईटचे लोकार्पण

February 9, 2026
जिल्हा पोलीस अधीक्षक अर्चित चांडक यांच्या उपस्थितीत तेल्हारा पो.स्टे.चे वार्षिक निरीक्षण
Featured

जिल्हा पोलीस अधीक्षक अर्चित चांडक यांच्या उपस्थितीत तेल्हारा पो.स्टे.चे वार्षिक निरीक्षण

January 1, 2026
Next Post
वाडेगाव

शिवप्रेमींनी छत्रपतीचा अपमान सहन करू नये- अमोलदादा मिटकरी

दिल्ली

अर्बन नक्सल म्हणून अटकेत असलेले बुध्दीजिवी शरद पवारांच्या एसआयटी तपासाच्या भूमिकेमुळे अधिक काळ जेल मध्ये अडकतील - राजेंद्र पातोडे.

आपली प्रतिक्रियाCancel reply

Stay Connected

  • 348 Followers
  • 281 Followers

हेही वाचा

No Content Available
Load More
Our Akola

बातमी आमची विश्वास तुमचा
लिहताय ? आपले लेख/ लिखाण अवर अकोला वर पाठवण्यासाठी आम्हाला आपल्या नावासहित इमेल करा - [email protected]

Follow Us

  • मुख्यपृष्ठ
  • अकोला
  • ठळक बातम्या
  • राज्य
  • फिचर्ड

© 2021 Ourakola - Managed by Fusion Technologies.

Welcome Back!

Login to your account below

Forgotten Password?

Retrieve your password

Please enter your username or email address to reset your password.

Log In
व्हॉट्सअ‍ॅप/ टेलिग्राम वर Subscribe करा

व्हॉट्सअ‍ॅपवर बातम्या मिळवण्याकरीता खालील लिंकवर
क्लिक करून व्हॉट्सअ‍ॅप ग्रुप जॅाईन करा.

 

टेलिग्राम Channel – https://t.me/ourakola

Whatsapp Channel – https://whatsapp.com/channel/0029VaCzRDc7YSdD90dbun2v


Twitter – https://twitter.com/ourakola
Facebook – https://www.facebook.com/OurAkolaMedia/
Youtube –  https://www.youtube.com/c/OurMediaNetworks

corona_worldwide_tracker

No Result
View All Result
  • मुख्यपृष्ठ
  • अकोला
  • ठळक बातम्या
  • राज्य
  • फिचर्ड
    • रूपगंध
    • लेखणी
    • अस्मिता

© 2021 Ourakola - Managed by Fusion Technologies.