बोर्डी( देवानंद खिरकर )- श्री नागास्वामी इंग्लिश स्कूल बोर्डी येथे स्नेह संमेलनाचे उदघाटन करण्यात येऊन विद्यार्थ्यांचे खेळ घेण्यात आले.व माता पालकांसाठी आनंद मेळावा घेण्यात आला. या कार्यक्रमाला प्रमुख अतिथी म्हणुन मावीमच्या त्रिशुला घ्यार व ईतर सहकारी, दिलीप रंधे सर, देवानंद भटकर सर उपस्थित होते.
दि. 03/01/2020 व दि. 04/01/2020 ला स्न्हेह संमेलन घेण्यात आले. प्रास्ताविक संस्थाध्यक्ष सुरेश गायकवाड सर यांनी केले. कार्यक्रमाची धिंम सैलूट अवर सोल्जर अशी होती. कार्यक्रमामधे सैनिकांच्या जीवनावर नाटक, देशभक्तीपर नृत्य, कीर्तन, गोंधळ, शेतकरी नृत्य, शिवाजी महाराज यांच्या जिवनावरील नाट्य, ईत्यादी नृत्य सादर करण्यात आले.
प्रमुख अतिथी म्हणून मनोहर गये, काशिनाथ ताडे, तुळशीराम इस्तापे, मोतिराम गावंडे, धनराज कंकाळ सर, सुनिल ताडे, गोकुळ लटकूटे, शरद अग्रवाल, गणेश पोटे (मुंडगाव), प्रदिप राऊत सर, व सौ. राऊत मैडम, हे उपस्थित होते.
संचालन सीमा कोल्हे, प्रीती आतकड, अनमोल जयस्वाल, वैष्णवी लाहोरे, यांनी केले.
कार्यक्रमासाठी वर्षा बुले,पल्लवी वरणकार, आरती गायकवाड, भाग्यश्री अंबळकार, अश्विनी धर्मे, यांचे सहकार्य लाभले.
कार्यक्रमाला शिक्षकेत्तर, कर्मचारी, ग्रामस्थ मोठ्या संख्येने उपस्थित होते.