अकोला (प्रतिनिधी)- कथक नृत्य मंदिर प्रस्तुत नृत्य छंद 2020 वार्षिक समारंभ शुक्रवारी संध्याकाळी प्रमिलाताई हॉल येथे संपन्न झाला. संस्थेच्या सुमारे शंभर विद्यार्थिनींनी या सोहळ्यामध्ये नृत्य प्रस्तुति दिली. कार्यक्रमाची सुरुवात गणेश वंदनेने झाली. त्यानंतर गुरुवंदना, राम भजन, तालपक्ष,श्री नारायण स्तुती, अभिनय गीत, काली वंदना यांची ची प्रस्तुती झाली. याप्रसंगी ज्येष्ठ नाट्यकर्मी प्रा. मधु जाधव यांचा सत्कार राधिका साठे यांनी केला. तसेच प्रा. मधु जाधव यांच्या हस्ते गुणवत्ताप्राप्त विद्यार्थिनींचा सत्कार करण्यात आला. कार्यक्रमाचा शेवट संस्थेच्या ज्येष्ठ विद्यार्थिनीच्या धमाल या पक्षाच्या सादरीकरणाने झाला.
साथ संगती साठी तबल्यावर मनिष हुडेकर, संवादिनीवर मनोज राऊत सर, गाण्यासाठी शुभम नारे हे होते. या कार्यक्रमाचे नियोजन कथक नृत्य मंदिर च्या ज्येष्ठ विद्यार्थिनी ईशानी साठे,तेजस्विनी मेशरकर, तृप्ती बोनते, तेजस्विनी समर्थ, सृष्टी माटे, आणि वैष्णवी सोनवणे यांनी केले कार्यक्रमासाठी रसिक वर्ग उपस्थित होता.