अकोला (सुनिल गाडगे)- दि २८ डिसेंबर रोजी (CAA )संशोधन बिल समरथनार्थ स्थानिक सीता बाई कला महाविद्यालय मध्ये ABVP द्वारा स्वाक्षरी मोहीम घेऊन जन जागृती करण्यात आली विद्यार्थ्यांना सांगण्यात आले की CAA हा कायदा कसा आणि काय आहे यामध्ये कुठल्याही प्रकारचा भेदभाव केला गेला नाही हा कायदा सरळ आणि साधा आहे या कायद्या विषयी जे अफवांचे पेव फुटले आहेत त्या गोष्टींना विराम मिळेल. असे ABVP च्या कार्यकर्त्यांनी या साठी प्रत्येक विद्यार्थ्याला वयक्तिक रित्या भेट देऊन व स्वाक्षरी मोहीम घेऊन या कायद्याची माहिती दिली या वेळी स्वाक्षरी मोहिमेला विद्यार्थ्यांचा उत्तम प्रतिसाद मिळाला या मध्ये विद्यार्थी परिषदचे विदर्भ प्रांत सहमंत्री ज्ञानेश्वर खूपसे ने घोषणा दिल्या की *तुम जाती वाद से तोडेंगे हम राष्ट्रवाद से जोडेंगे* अकोला जिल्हा संयोजक मनीष फाटे ग्रामीण भाग संयोजक ऋषी केश देवर महानगर संगाहतन मंत्री शक्ती केराम महाविद्यालय प्रमुख शुभम काजे सह शेकडो आदी कार्यकर्ते उपस्थित होते.