अकोला (जिमाका)- आगामी जिल्हा परिषद व पंचायत समिती सार्वत्रिक निवडणूक 2020 च्या अनुषंगाने तालुका झोननिहाय निवडणूक यंत्रणेचा आज विभागीय आयुक्त पियुष सिंह यांनी आढावा घेतला. जिल्हाधिकारी कार्यालयात पार पडलेल्या आढावा बैठकीत मतदान यंत्र ते आचार संहितेची प्रभावी अंमलबजावणीबाबत आढावा घेण्यात आला.
या बैठकीस जिल्हाधिकारी नरेंद्र लोणकर, निवडणूक शाखेचे उपजिल्हाधिकारी राजेश खवले, निवासी उपजिल्हाधिकारी संजय खडसे, तहसिलदार, सहाय्यक निवडणूक निर्णय अधिकारी व नोडल अधिकारी उपस्थित होते.
विभागीय आयुक्त सिंह यांनी यावेळी, मतदान यंत्र सिलींगचे नियोजनाबाबत सविस्तर चर्चा करण्यात आली. तसेच मतदान केंद्रांवर मतदारांना द्यावयाच्या सर्व सुविधा, मतदान टक्केवारी वाढविण्यासाठी मतदार जनजागृती उपक्रम, कायदा सुव्यवस्था, प्रतिबंधात्मक उपाययोजना, मतदान यंत्रांची सुरक्षा व्यवस्था आदी सर्व व्यवस्थांबाबत आढावा घेतला.