आडगाव बु (प्रतिनिधि /दिपक रेळे) – जिल्हा परिषद विद्यालय आडगाव बु येथे समग्र शिक्षा अंतर्गत व्यवसाय शिक्षण रिटेल वर्ग नऊ ते बारावीच्या विद्यार्थ्यांसाठी २०१५ पासून सुरू करण्यात आला अाहे. रिटेल कामकाजाविषयी प्रत्यक्ष माहिती जाणून घेण्यासाठी तसेच तसेच रिटेल अभ्यासाविषयी अधिक माहिती जाणून घेण्यासाठी रिटेल विषयाच्या वर्ग ९, १० व १२ च्या विद्यार्थ्यांसाठि क्षेत्रभेटिचे शिवांगी बेकर्स पार्ले फूड खामगाव येथे दिनांक २१ डिसेंबर २०१९ रोजी आयोजन करण्यात आले होते.
सदर क्षेत्र भेटीमध्ये विद्यार्थ्यांना पारले जी चा विविध उत्पादनाची निर्मिती प्रक्रिया, पुरवठा साखळी व्यवस्थापन, पॅकेजिंग, ब्रँडिंग, मार्केटिंग जाहिरात आणि प्रमोशन, कर्मचाऱ्यांची सुरक्षा तसेच पर्यावरणाचा सुरक्षेतेबाबत मार्गदर्शन समन्वयक पारलेजी खामगाव चे श्री रवी बैस सर यांनी केले तसेच रिटेल विषयाबाबत व क्षेत्री भेटीबाबत विद्यार्थ्यांना प्रश्न विचारले. सदर क्षेत्रभेटी करिता महाविद्यालयाचे मुख्याध्यापक सन्माननीय श्री रवींद्र जाधव सर एम्पॉवर प्रगतीचे समन्वयक श्री अंकुर बनसोड सर,श्री शोभित कुमार तिरपुडे सर, लॅन्ड ए हॅन्ड चे समन्वयक श्री विक्रम शिंदे सर श्री मिलिंद लोखंडे सर, शारदा जाधव मॅडम व रिटेल व्यवसाय शिक्षक श्री अभिजित लोखंडे सर यांनी केले.