अकोला(दीपक गवई)- क्रीडा व युवक सेवा संचालनालय, महाराष्ट्र राज्य, पुणे यांच्या विद्यमानाने व जिल्हा क्रीडा अधिकारी कार्यालय, अकोला व्दारा आयोजित अनिवासी क्रीडा प्रशिक्षण शिबीर (कुस्ती/बॉक्सींग) चे आज दिनांक 10 डिसेंबर 2019 रोजी सायंकाळी 6:30 वा. वसंत देसाई क्रीडांगण, अकोला येथे मा.श्री. विजय लोखंडे, तहसिलदार, अकोलायांच्या हस्ते उद्घाटन करण्यात आले. कार्यक्रमाचे अध्यक्ष म्हणून मा.श्री. शत्रुघ्न बिडकर, शिवछत्रपती क्रीडा पुरस्कार्थी, प्रमुख अतिथी म्हणून मा.शरद घरडे, लेखाधिकारी, जिल्हाधिकारी कार्यालय, अकोला, मा.डॉ. रविंद्र चौधरी, अकोला, जिल्हा क्रीडा अधिकारी आसाराम जाधव, राज्य क्रीडा कुस्ती प्रशिक्षक लक्षमीशंकर यादव, राज्य क्रीडा बॉक्सींग प्रशिक्षक सतिशचंद्र भट हे मंचावर उपस्थित होते. या वेळी उपस्थितीत सर्व मान्यवरांनी खेळाडूंना प्रोत्साहानात्मक प्रबोधन केले. मिशन ऑलीम्पिक मध्ये देशाचे नाव लौकीक करण्याचे आहवान सर्व मान्यवरांनी खेळाडूंना केले आहे.
सदर शिबीर जिल्हा क्रीडा प्रशिक्षण कुस्ती व बॉक्सींग स्व. वसंत देसाई स्टेडियम, अकोला येथील नियमित सराव करणारे खेळाडू करीता आहे. शिबीर दोन टप्पे मध्ये घेण्यात येणार आहे. पहिला टप्पा दि. 10 ते 19 डिसेंबर 2019 पर्यंत चालणार आहे. खेळाडूंना तंत्र शुध्द प्रशिक्षण व आहार प्रथमोपचार, मानसिक संतुलन, स्पर्धा पुर्व तैयारी इत्यादी माहिती व प्रशिक्षण देण्यात येणार आहे.
कार्यक्रमाचे सुत्र संचालन राज्य क्रीडा मार्गदर्शक श्री लक्षमीशंकर यादव यांनी केले व आभार प्रदर्शन श्री सतिषचंद्र भट्ट यांनी केले. या वेळी राष्ट्रीय स्पर्धा मध्ये विजयी खेळाडंूचे मान्यवरांच्या हस्ते पुष्पगुच्छ देवून स्वागत सत्कार करण्यात आले. अनिवासी क्रीडा प्रशिक्षण शिबीर (कुस्ती/बॉक्सींग) यशस्वी करण्यात करीता जिल्हा क्रीडा अधिकारी कार्यालयाचे सर्व कर्मचारी अथक परिश्रम घेत आहे.