तेल्हारा ता २७: तेल्हारा तालुका लोकजागर मंच कार्यालय येथे भारतीय संविधान दीना निम्मित भारतीय संविधान उद्देशिका चे सामूहिक वाचन करून शपथ घेण्यात आली यावेळी भारतीय संविधान वाचन करून लोकशाही चा दिवस साजरा करण्यात आला व त्यानंतर २६/११ शहिदांना श्रद्धांजली अर्पण करून दोन मिनिटं मोन बाळगून श्रद्धांजली देण्यात आली.
यावेळी प्रमुख उपस्थिती मध्ये पत्रकार रामा फाटकर, पत्रकार पंकज भारसाकळे, सामजिक कार्यकर्ता डीगंबर तायडे, हे होते यावेळी संविधानाचे शिल्पकार डॉ बाबासाहेब आंबेडकर यांचे प्रतिमेचे हारार्पण पूजन करण्यात आले त्यांनतर उपस्थितांनी त्यांच्या जीवनावर प्रकाश टाकला यावेळी लोकजागर मंच चे तालुकाध्यक्ष अमोल जवंजाळ, शहराध्यक्ष राजेश काटे, जिल्हा कार्याध्यक्ष गोपाल जळमकार ,दिपक अहेरकर ,विनोद सगणे, सागर गङस्कार, गुरुदेव विसमोरे, शिवा दिंङोकार ,राजु ताथोङ, शाम गावंङे . नितीन साबळे पवन भारसाकळे,शाम अहेरकर, देशमुख बाप्पु, चंद्रकांत मोरे. आदी उपस्थित होते