अडगाव बु. (दीपक रेळे)- अडगाव बु. येथिल जिल्हा परिषद प्राथमिक मुलींच्या शाळेत 1 शाळेचा ड्रेस, 1 स्पोर्ट ड्रेस, 1 टाय, 1 बेल्ट आणि 1 तारा कंपनीचा बूट असे सर्व साहित्य मुलींना वाटप 16.09.2019. रोजी सकाळी शाळा व्यवस्थापन समिती अध्यक्ष श्री. मोहन भाऊ मानकर यांचे हस्ते सर्व मुलींना वाटप करण्यात आले. मुलीं ना शिक्षणाची गोडी लागली पाहिजे असा सरकारचा निर्णय आहे. तसेच शाळेत शिकत असताना त्यांना खेळ व क्रीडा स्पर्धा आयोजित करुन त्यांना उत्तेजन दिले जाते. तसेच शाळेत विविध कार्यक्रम आयोजित करण्यात येतात. आजच्या कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी शाळा व्यवस्थापन समिती चे अध्यक्ष मोहन भाऊ मानकर, मुलींच्या शाळेचे मुख्याध्यापक श्री नाठे सर, शिक्षक श्री नितीन राजनकर, श्री कौलकर सर, केदार मैडम, नालिंदे मैडम, आदीसर्व उपस्थित होते.