तेल्हारा (योगेश नायकवाडे)- महावितरण मधील कार्यरत कर्मचारी, अधिकारी यांना अथक परिश्रम आणि अभ्यासु नेतृत्व असलेल्या एम एस इ वर्कर्स फेडरेशन चे अध्यक्ष कॉ. मोहन शर्मा, कार्याध्यक्ष कॉ. सि एन देशमुख यांचा नुकतेच अकोला परिमंडळ ची आढावा बैठक साठी आले, असता तेल्हारा शाखा तर्फे शाखा सचिव कॉ अफसर शाह अन्वर शाह, अकोट विभागीय साचीव कॉ योगेश राऊत, झोनल तांत्रिक सदस्य कॉ निलेश मगर यांनी पुष्पगुच्छ देऊनसत्कार केला. संघटनेने 65 वर्षांतील ऐतिहासिक पगारवाढ मिळून दिल्याने विशेष आभार मानले. यावेळी तेल्हारा शाखेचे नरेंद्र वानखडे, गणेश उज्जैकर, निखिल मिसाळ, सौ सुनंदा काळे, सुदाम भगत, तायडे ऑपरटर, संजय माकोडे, राजसिंग गोठवाल, नागो अमझरे, कमलेश घासे सहित एम एस इ वर्कर्स फेडरेशन तेल्हारा शाखेचे सभासद उपस्थित होते.