अकोला (प्रतिनिधी)- स्थानिक गुन्हे शाखा अकोला निरिक्षक मा.श्री.शैलेश सपकाळ साहेब यांचे आदेशा नुसार दि. 7/9/2019 रोजी अकोट ग्रामीन पोलिस स्टेशन अंतर्गत ग्राम बोर्डी येथे गोपनीय माहिती मिळाल्या वरुन धाड टाकली असता बोर्डी येथिल अवैधरित्या दारू विक्री करणारे फरार आरोपी श्याम अर्जुन लटकुटे, रविंद्र अर्जुन लटकूटे, मंगेश रामदास लटकूटे, सर्व राहणार बोर्डी या तिघांन विरुध्द कलम 65 ई महाराष्ट्र दारू बंदी अधिनियम नुसार कार्यवाही करुन सदर गुन्ह्यात देशी ,विदेशी दारू किंमत 27270 रुपये तसेच एक्टिवा गाडी पांढऱ्या रंगाची किंमत 32000 रुपये तसेच दारू विक्रिचे 2060 असा एकुण 61330 रुपयेचा मुद्देमाल जप्त करुन आरोपी सह पोलिस स्टेशन अकोट ग्रामीन यांचे ताब्यात देण्यात आले आहेत. सदरची कार्यवाही ही पो.उपनिरिक्षक तुषार नेवारे, अशोक चाटे, रफिक शेख, एजाज रवी, अनिल घुमन यांनी केली आहे. बोर्डी येथे गेल्या कित्येक दिवसापासुन सुरु असलेले खुलेआम अवैध धंदे अकोट ग्रामीन पोलिस स्टेशनचे उमरा बिट जमदार व डी बी स्काड पथक यांच्या हप्तेखोरी मुळे सुरु असल्याचे बोलले जात आहे. त्यामूळे अकोट ग्रामीन पोलिस यांच्या कार्यप्रणालीवर प्रश्णचिन्ह निर्माण झाले आहे. तरी याकडे जिल्हा पोलिस अधिक्षक साहेब यांनी लक्ष देने गरजेचे आहे.










