अकोट(सारंग कराळे)– अकोट विधानसभा मतदारसंघांमध्ये भाजपाने स्थानिक कार्यकर्त्याला उमेदवारी द्यावी या मागणीवर सर्वजण ठाम आहोच, परंतु स्थानिक कार्यकर्ते हवा असला तरी काँग्रेसची घराण्याची नाळ असलेला उमेदवार मुळीच चालणार नाही, असा निर्णय पक्षश्रेष्ठीना कळविण्यात यावा असे आकोट येथे८ सप्टेंबर रोजी पार पडलेल्या पदाधिकारी कार्यकर्त्यांच्या बैठकीत ठरविण्यात आले.
स्थानिक राज मंगल कार्यालयामध्ये अकोट तेल्हारा तालुक्यातील भाजपाच्या जुन्या-नव्या पदाधिकारी व कार्यकर्त्यांची मोठी बैठक पार पडली. या बैठकीमध्ये आमदार प्रकाश भारसाकळे यांच्या कार्य व विचकट वकृत्व शैली वर नाराजी दर्शवली. तसेच भाजपाचै राज्य व केंद्र शासनाने मोठ्या प्रमाणात अकोट मतदारसंघात निधी देऊनही दर्जेदार कामे झाली नाही. पाच वर्षाचा कालावधी उलटून गेला, चौपदरीकरण केल नाही. ग्रामीण रस्तासह इतर विकास कामावरून जनतेमध्ये प्रचंड नाराजी आहे. बटालियन कॅम्प, वान धरणाचे पाणी या प्रश्नावरून आमदार जनतेचे समाधान करू शकत नाही. त्यांना योग्य प्रश्न उत्तरे न देता निघून जात आहे,२०१४ मध्ये वेळेवर युती तुटल्याने निवडणूक करीता कोणत्याही कार्यकर्त्याची तयारी नव्हती झाली. परंतु सध्या स्थितीत स्थानिक उमेदवार मोठ्या प्रमाणात इच्छुक आहेत. स्थानिक कार्यकर्ता हाच अकोट मतदार संघात भविष्यातला आमदार झाला तर तो योग्य पद्धतीने लोकांचे प्रश्न समजून घेऊ शकतो, अशी जनभावना कार्यकर्ते व जनतेमध्ये झाली आहे. या भागात भाजपचे पक्षबांधणीसाठी प्रत्यक्ष काम करणाऱ्या कार्यकर्त्याला उमेदवारी देण्यात द्यावी. आकोट मतदारसंघांमध्ये जनसंघ पासून भाजपच्या कार्यकर्त्यांनी काँग्रेस घराणेशाही विरुद्ध लढा दिला आहे. अशा स्थितीत काँग्रेस घराण्याशी नाळ जुळलेल्या इच्छुक उमेदवाराला उमेदवारी देण्यात येऊ नये, भाजप कार्यकर्ते व पदाधिकाऱ्यांमध्ये पुन्हा नाराजीचा सूर उमटू नये याकरीता काँग्रेस घराणेशाही तील उमेदवाराला तीव्र विरोध या बैठकीमध्ये करण्यात आला. अकोट तेल्हारा तालुक्यातील एका शिष्टमंडळाने पक्षश्रेष्ठींची भेट घेऊन मतदारसंघातील जनतेच्या कार्यकर्त्यांच्या भावना मांडावे असे ठरवण्यात आले. या बैठकीला अकोट नगराध्यक्ष
हरीनारायन माकोडे, राजेंद्र पुंडकर भाजपा जिल्हा बुथ प्रमुख राजेश नागमते, माजी नगराध्यक्ष पुरुषोत्तम चौखंडे, डॉ गजानन महाले जयदेवराव साबळे संदीप उगले शंकरराव पुंडकर राजेश टोहरे सुदेश शेळके भवानीप्रताप देशमुख लखन राजनकार भरतीताई गावंडे शोभाताई बोडखे अरुण ढोकने नगरसेविका सौ धुळे विवेक धुळे प्रभाकरराव पांडे सुनील गिरी विशाल जैस्वाल अतुल विखेविठ्ठल वाकोडे विठ्यलराव गुजारकर रवींद्र वावरे देवानंद डोबाळे मयूर आसरकार राजू शेळके शिवदास तेलगोटे रवींद्र मालखेडे दत्तापाटील चौधरी राजू पांडे नितीन टोलमारे निलेश नवद निलेश तिवारी कपिल ढोकने प्रल्हादराव मेंढे गजानन मेंढे उमेश अढाऊ राम बोन्द्रे बाळूभाऊ वानखडे गणेश नाठे प्रवीण कराळे विक्रम ठाकूर गजानन पाथरीकर रामकृष्ण वाघमारे माणिकराव गावंडे राजकुमार आवारे राजू चावके अनिल तवंर गजानन माकोडे शर्मा गोपाल कडाळे महादेवराव रेखाते राजू मोहोकार राजकुमार खंडेराव, डॉ कैलास मालखडे यांच्यासह मोठ्या प्रमाणात तालुक्यातील ग्रामीण भागातील कार्यकर्ते उपस्थित होते.