अकोट (दिपक रेळे)- संपूर्ण विदर्भाच्या भाविकांची श्रद्धा असलेली धारगड महादेवाची यात्रा श्रावण महिण्याच्या तिसऱ्या रविवारी आणि सोमवारी भरत असते. सातपुडा पर्वतात अकोला आणि अमरावती जिल्ह्यात असलेल्या मेळघाट मध्ये प्राचीन काळापासून असलेल्या डोंगर गडावरुन पाण्याची धार खाली गुहेत महादेवाच्या पिंडीवर पडते. म्हणून या तीर्थक्षेत्राला धारगड असे नाव पडले. मेळघाट व्याघ्र प्रकल्पाच्या अतिसंरक्षित गाभा क्षेत्रात येत असल्याने दरवर्षी वर्षातुन फक्त एकदाच श्रावण महिन्याच्या तिसऱ्या रविवारी आणि सोमवारीच भाविकांना महादेवाचे दर्शनाची परवानगी मिळत असल्याने त्या दिवशी हजारो लाखोंच्या संख्येने भाविक आणि पर्यटक येथे येत असतात. अनेक भाविक भक्त कावड द्वारे जल आणून धारगड महादेवाचा जलाभिषेक करतात. ह्यावर्षी ही यात्रा अतिशय उत्साहात पार पडली.
धारगड मार्गावरच सातपुडा पर्वतातील प्रमुख पर्यटन स्थळ म्हणून ओळखले जाणारे सूर्या उर्फ सुलई धबधबा हे पर्यटकांना नेमीच आकर्षित करत असते. निसर्गाच्या सानिध्यात हिरव्याकच्च वनराई च्या मधोमध खळखळून वाहणाऱ्या पांढरा शुभ्र पाण्याच्या ह्या धबधब्याला पाहून पर्यटकांच्या डोळ्याचे पारणे फिटले शिवाय राहत नाही. म्हणूनच प्रत्येक पावसाळ्यात सूर्या धबधबा नेहमी पर्यटकांना खुणावत असतो.
धारगड यात्रेनिमित्त भाविकांच्या सेवेसाठी श्रीक्षेत्र धारगड सेवा समिती, यांच्यासह अनेक दानशूर व्यक्ती, व्यापारी उद्योजक, सामाजिक धार्मिक संघटना, व अनेक सेवाभावी संस्थानी ठिकठिकाणी महाप्रसाद, फराळ, अल्पउपहार, फळे, शिरा, चहा थंड पाणी, गरम नाश्ता इत्यादींची धारगड गुफेजवळ आणि संपूर्ण रस्त्यात व्यवस्था केली होती. संपूर्ण वनविभाग, अकोला आणि अमरावती पोलीस दल, तसेच दोन्ही जिल्ह्यांच्या प्रशासकीय यंत्रणांनी चोख बंदोबस्त ठेवून यात्रा नियोजनबद्ध पद्धतीने पार पाडली.
अधिक वाचा : सुशिक्षित बेरोजगांसाठी तपेश्वरीचा नोकरी मेळावा एक स्तुत्य उपक्रम – श्री.ह.भ.प. वासुदेवराव महाराज महल्ले
अवर अकोला ला फेसबुक वर लाईक करा – www.facebook.com/OurAkolaMedia
अवर अकोला’च्या यूट्यूब चॅनेलला सबस्क्राईब करा – www.youtube.com/OurMediaNetworks
अवर अकोला ला ट्विटरवर फॉलो करा – https://twitter.com/ourakola
अवर अकोला ला इन्स्टाग्रामवर फॉलो करा – www.instagram.com/OurAkola