आकोट (सारंग कराळे)- आजचा युवा वर्ग नोकरीकरिता पदवी किंवा पदव्युत्तर शैक्षणिक अर्हता प्राप्त करतो. त्यासोबतच व्यवसायिक अर्हतासुध्दा प्राप्त करतो. त्यांच्या गुणवत्तेनुसार योग्य नोकरी मिळत नाही. त्याचे महत्त्वाचे कारण म्हणजे योग्य मार्गदर्शनचा अभाव. परंतु या जिल्ह्याचे सुपुत्र श्री भरत विठ्ठलराव इंगळे यांनी बेरोजगार विद्यार्थ्यांना योग्य दिशा मिळावी , या सद्हेतुने तपेश्वरी शिक्षण प्रसारक मंडळ, पुणे या त्यांचे संस्थेव्दारा भव्य नोकरी मेळावा आयोजीत केला, हा ख-या अर्थानं स्तुत्य उपक्रम असून आजच्या काळाची गरज असल्याचे गौरवपूर्ण उद्गार श्री संत वासुदेव महाराज ज्ञानपीठ संस्था आकोटचे अध्यक्ष श्री.ह.भ.प. वासुदेवराव महाराज महल्ले यांनी व्यक्त केले.
श्री क्षेत्र श्रध्दासागर येथे आयोजीत या भव्य नोकरी मेळाव्याकरिता आकोट व तेल्हारा या दोन तालुक्यांसह लांबलांबच्या शेकडो विद्यार्थ्यांनी हजेरी लावत सकाळपासूनच नोंदणी करण्यासाठी गर्दी केली होती. या मेळाव्याच्या प्रारंभी दीप प्रज्वलन करुन समर्थ सद्गुरु श्री संत वासुदेव महाराज यांच्या प्रतिमेचे पूजन व हारार्पण मान्यवरांनी केले. याप्रसंगी आकोटचे नगराध्यक्ष हरिनारायण माकोडे, तेल्हा-याच्या नगराध्यक्षा सौ जयश्रीताई पुंडकर, नगरसेवक तेलगोटे, राजेश नागमते, विठ्ठल महाराज इंगळे, रामकृष्ण महाराज ढोले, भरत इंगळे, प्रगतशील शेतकरी एकनाथराव इंगळे, वह्राडी साहित्यिक तथा जलतज्ञ विजयराव इंगळे, संताजीराव घोरपडे घराण्याचे श्री शामराव घोरपडे, पि के व्ही च्या अधिकारी प्रज्ञाताई गणेश इंगळे, वासुदेवराव इंगळे ,
आदी मान्यवर उपस्थित होते.याप्रसंगी मान्यवरांचे मान्यवरांनी मार्गदर्शन केले.
कार्यक्रमाचे संचालन सौ.अनिता इंगळे यांनी, प्रास्ताविक शिवराज इंगळे, आभार प्रदर्शन कपिल इंगळे यांनी केले. कार्यक्रमानंतर आलेल्या उमेदवारांच्या विविध कंपनीच्या प्रतीनिधींनी मुलाखती घेतल्या. कार्यक्रमाला सहकार्य अनंता इंगळे, राजुभाऊ वाकडे, सुदाम इंगळे ,अर्जुन इंगळे, मनोहर इंगळे, शिवहरी मंगळे, धनंजय इंगळे, पुरुषोत्तम इंगळे, उमेश मोहोकार, मिलिंद इंगळे, अजय भटकर, लक्ष्मण इंगळे, आकाश सावरकर रघुनाथ इंगळे,यांचे लाभले.