अकोला (प्रतिनिधी)- नागपुर संत तुकळोजी महाराज विद्यापीठाअंतर्गत येत असलेल्या एका महाविद्यालयाच्या विद्यार्थीनीवर बलात्कार करून तीला 10 तास वस्तीगृहात डांबून ठेवल्याच्या निषेधार्थ आज मा. खासदार नाना पटोले यांच्या मार्गदर्शनाखाली महाराष्ट्र प्रदेश काँग्रेस कमिटी अनुसूचित जाती विभाग अकोला तर्फे अकोला पुर्व विधानसभा अध्यक्ष अंकुश गावंडे यांच्या तर्फे जिल्हा अधिकारी यांना निवेदन देण्यात आले.
आरोपींना तात्काळ अटक करून शिक्षा व्हावी यासाठी, हे निवेदन देण्यात आल्याचे काँग्रेसचे अंकुश गावंडे यांनी सांगितले. यावेळी अकोला शहर अध्यक्ष आकाश शिरसाट, कीसान क्रांती सेनेचे प्रदेशाध्यक्ष मंगेश भारसाकळे, काँग्रेस सेवादलाचे अकोला जिल्हा अध्यक्ष माणिक शेळके, निरज बडगे, अपुल राठोड, प्रतिक सुरवाडे आदी उपस्थित होते.
अधिक वाचा: हिवरखेड पोलीस स्टेशन हद्दीतील देडतलई येथे जुगार अड्डयावर छापा
अवर अकोला ला फेसबुक वर लाईक करा – www.facebook.com/OurAkolaMedia
अवर अकोला’च्या यूट्यूब चॅनेलला सबस्क्राईब करा – www.youtube.com/OurMediaNetworks
अवर अकोला ला ट्विटरवर फॉलो करा – https://twitter.com/ourakola
अवर अकोला ला इन्स्टाग्रामवर फॉलो करा – www.instagram.com/OurAkola