हिवरखेड(प्रतिनिधी)- उपविभागीय पोलिस अधिकारी श्सुनिल सोनवणे यांच्या पथकाने 9 आॅगस्ट रोजी देडतलई तितली भवरा यावर चालु असलेल्या जुगार अड्ड्यावर छापा टाकून नागेश ब्रम्हदेव इंगळे, अक्षय गणेश बोडखे, यांना ताब्यात घेतले व संदेश सपकाळ हा फरार झाला ताब्यातील इसमांकडुन तितली भवरा साहित्य व रोख 680 रूपये, 2 मोबाईल किंमत 1000 रूपये, एक मोटार सायकल किंमत 25000 रूपये असा एकूण 26680 रूपयाचा मुद्देमाल जप्त केला. सदरची कारवाई सुनिल सोनवणे, उपविभागीय पोलिस अधिकारी अकोट यांचे मार्गदर्शनाखाली नापोकॉ राजेश्वर सोनोने, पोकॉ.हर्षद देशमुख, पोकॉ.अनिल लापूरकर यांनी केली.
अवर अकोला ला फेसबुक वर लाईक करा – www.facebook.com/OurAkolaMedia
अवर अकोला’च्या यूट्यूब चॅनेलला सबस्क्राईब करा – www.youtube.com/OurMediaNetworks
अवर अकोला ला ट्विटरवर फॉलो करा – https://twitter.com/ourakola
अवर अकोला ला इन्स्टाग्रामवर फॉलो करा – www.instagram.com/OurAkola