तेल्हारा (प्रतिनिधी)- तालुक्यातील तळेगाव वडनेर येथे या पूर्वी मंजूर करण्यात आलेला भारत राखीव बटालियन कॅम्प शिसा उदेगाव व हिंगणा शिवारात हलविण्यात आल्याने येथील सुशिक्षित बेरोजगार युवकांचा प्रश्न निर्माण झाला आहे. त्यामुळे सदर कॅम्प तेल्हारा तालुक्यातच राहावा या करिता ९ऑगस्ट ला विश्रामगृह तेल्हारा येथे सर्व पक्षीय व सामाजिक संघटन बैठकीमध्ये कृतीसमितीची स्थापना करण्यात अली असून मंगळवार दि.13 ऑगस्टला अकोट विधानसभा मतदारसंघ बंद चे आवाहन करण्यात आले. तसेच बंद नंतर शासनाचे लक्ष वेधून घेण्यासाठी आंदोलन अधिक तीव्र करण्याचे बैठकीत ठरविण्यात आले.
तेल्हारा तालुक्यातील तळेगाव वडनेर येथे होणारा( आय.आर .बी.) भारत राखीव राखीव बटालियन कॅम्प क्र.५ आता राज्य मंत्रिमंडळाच्या बैठकीत बुधवारी देण्यात आलेल्या मान्यतेनुसार अकोला तालुक्यातील शिसा उदेगाव व हिंगणा येथे निर्मिती होणार आहे. त्यामुळे हा तालुक्यावर अन्याय आहे हा प्रकल्प इतरत्र इतरत्र वळविल्या गेल्यामुळे सुशिक्षित बेरोजगार युवकांना मिळणाऱ्या रोजगारावर गदा आली आहे. आधीच या तालुक्यात कोणत्याही प्रकारची रोजगाराची संधी येथील युवकांना नाही त्यामध्ये आता तळेगाव वडनेर येथे सदर कॅम्प बद्दल संबंधी त अधिकाऱ्यांनी सकारात्मक अहवाल दिल्यामुळे च कॅम्प ला मंजुरी मिळाली असतांना ऐनवेळी हा प्रकल्प इतरत्र पडविण्यात आला. हा तेल्हारा तालुक्यावरच न्हवे तर संपूर्ण आकोट मतदारसंघावर हा अन्याय झाला आहे. त्यामुळे सदर भारत राखीव बटालियन कॅम्प तळेगाव वडनेर येथेच राहावा याकरीत विचार विनिमय करून ही मागणी रेटून धरण्यासाठी काय करता येईल हे बैठकीत ठरविण्यात आले. यावेळी अनुप मार्के, सौ.संजीवनीताई बिहाडे,महेश गणगणे, विवेक खारोडे, चंद्रकांत मोरे, रामभाऊ फाटकर, संदीप खारोडे, दिलीप बोचे, प्रदीप वानखडे , सौ. मनिषा देशमुख , डाॅ. अशोकराव बिहाडे, सचिन थाटे, अमोल जवंजाळ , पदमाताई अहेरकर, कैलास भोजने, संदीप इंगळे, प्रकाश वाकोडे, अशोक दारोकार इत्यादींनी आपले मत व्यक्त केले.
या बैठकीला तालुक्यासह संपुर्ण अकोट मतदार संघातील सर्व सामाजिक संघटनेचे पदाधिकारी, राजकिय पक्षाचे पदाधिकारी कार्यकर्त्यांनी उपस्थित होते. यावेळी सर्वपक्षीय बटालियन बचाव कृती समिती स्थापन करण्यात आली त्यामध्ये या कृती समितीत तेल्हारा तालुक्यातील डॉ संजविनीताई बिहाडे, प्रकाश वाकोडे,रमेश ताथोड,पद्माताई अहेरकर, विजय मोहोड, अजय गावंडे,संदीप इंगळे,विकास पवार,अनुप मार्के,मोईन शेख,चंद्रकांत मोरे,प्रा प्रदीप ढोले,गजानन थोरात,अमोल जवंजाळ, अनंत मनतकार, शिवशंकर डिगोडे, गोवर्धन डाबेराव ,अनंत ताथोड,रामकृष्ण मनतकार, देवितास ताथोड,कैलास ताथोड,किशोर ताथोड, रविंद्र मनतकर ,नारायण पोहोरकार, किरण अवताडे,मुन्ना भाऊ बिहाडे, प्रफुल्ल दबळघाव,श्याम भोपळे, मुन्ना मिरसाहेब , व पत्रकार म्हणून अनंत अहेरकर, सत्यशील सावरकर, आनंद बोदळे, यांचा समावेश असून आकोट तालुक्यातुन माजी आमदार संजय गावंडे, प्रदिप वानखडे, दिलीप बोचे, महेश गण गणे, तुषार पुंडकर संजय बोडखे, राहुल कराळे, श्याम गावंडे, चंदू दुबे, हरिभाऊ वाघोडे, ऍड ब्रिजमोहन गांधी,संजय आठवले, केशवराव बिलबिले, संदीप आगरे, सतीश हाडोळे, गजानन बोरोकर, पत्रकार,विजय शिंदे,चंद्रकांत पालखडे यांचा समावेश आहे.
अवर अकोला ला फेसबुक वर लाईक करा – www.facebook.com/OurAkolaMedia
अवर अकोला’च्या यूट्यूब चॅनेलला सबस्क्राईब करा – www.youtube.com/OurMediaNetworks
अवर अकोला ला ट्विटरवर फॉलो करा – https://twitter.com/ourakola
अवर अकोला ला इन्स्टाग्रामवर फॉलो करा – www.instagram.com/OurAkola
Comments 2