दापुरा(दीपक दारोकार)- तेल्हारा तालुक्यातील दापुरा येथील २६ वर्षीय युवक महेंद्र रामकृष्ण वानखडे हा काल दापुरा येथील पोहरा नाल्यात वाहून गेला होता. काल दिवसभर ( तेल्हारा तालुक्यातील दोन युवक पुराच्या पाण्यात वाहून गेले)शोध घेतला असता तो मिळून आला नव्हता आज सकाळी घटनास्थळा पासून काही अंतरावर एका शेताच्या काठावर शेतमालकाला महेंद्रचा मृतदेह आढळून आला.यावेळी घटनास्थळी नागरिकांनी एकच गर्दी केली असून ठाणेदार विकास देवरे व त्यांचा ताफा घटनास्थळी दाखल होऊन पंचनामा सुरू आहे.तर पंचगव्हान येथील प्रशांत बाळकृष्ण गवारगुरू 30 हा काल दुपारी विद्रुपा नदीच्या पुरात वाहून गेला मात्र अद्याप त्याचा शोध लागला नसून शोध कार्य युद्धपातळीवर सुरू आहे.
बातम्या तुमच्यापर्यंत पोहचवण्यासाठी आमचा Whatsapp नंबर Our Akola नावाने Save करा. 9765123455