तेल्हारा : माजी परराष्ट्रमंत्री प्रखर वक्त्या सुषमा स्वराज यांना स्थानिक भागवत मंगल कार्यालय येथे भारतीय जनता पक्षाच्या वतीने ता. 7 ऑगस्ट, बुधवार रोजी शोकसभा घेवुन श्रद्धांजली अर्पण करण्यात आली .
यावेळी भाजपा चे जिल्हा सरचिटणीस डॉ बाबुराव शेळके , नगराध्यक्षा जयश्री पुंडकर, भाजपाच्या जेष्ठ नेत्या नयनाताई मनतकार, धर्मेश चौधरी, रमेश दुतोंडे , बाबासाहेब मुर्हेकर यांनी श्रध्दांजलीपर भाषणे दिली. सुषमा स्वराज यांच्या प्रतिमेला पुष्पार्पण करण्यात आले व मौन ठेवून सामुहिक श्रद्धांजली देण्यात आली यावेळी शोकसभेला तालुका अध्यक्ष गजानन उंबरकार, शहर अध्यक्ष ओम सुईवाल, नगरसेवक नरेश आप्पा गम्भिरे, अनिल पोहणे, महेंद्र गोयनका, रवी गाडोदीया, दिपक पोहणे, लखन राजनकार, प्रकाश बरिंगे, अतुल विखे, योगेश भारुका, राजेश कुकडे, विजय देशमुख, अक्षय पदवाड, मोहन खेडकर, मोजिब ठेकेदार, विनायकराव अवचार, श्रीधर भारसाकडे यांच्या सह भाजपाचे पदाधिकारी कार्यकर्ते मोठ्या संख्येने उपस्थीत होते . सुत्रसंचालन तालुका सरचिटणीस किशोर भागवत यांनी केले.
अधिक वाचा : तेल्हारा येथे क्रांतिदिनी खड्डेमय रस्त्यांसाठी शिवभक्तांचे बांधकाम विभाग कार्यालयासमोर धरणे आंदोलन
अवर अकोला ला फेसबुक वर लाईक करा – www.facebook.com/OurAkolaMedia
अवर अकोला’च्या यूट्यूब चॅनेलला सबस्क्राईब करा – www.youtube.com/OurMediaNetworks
अवर अकोला ला ट्विटरवर फॉलो करा – https://twitter.com/ourakola
अवर अकोला ला इन्स्टाग्रामवर फॉलो करा – www.instagram.com/OurAkola










