अकोट (प्रतिनिधी) : अकोट आज दि १२-०७-२०१९ रोजी अकोला येथे वंचित बहुजन आघाडी कडून विधानसभा ईछुक उमेदवारीची अर्ज घेणे सुरु झाला आहे यात अकोट येथील सै शरीफ राणा यांनी पक्ष कार्यालयात आपला उमेदवारीचा अर्ज दखल केला आहे अकोट येथील वंचित बहुजन व भारिप बहुजन महासंघ पक्षात १९८५ पासून पक्षासाठी कार्य करत आहे ८९ व ९९ साली अपक्ष विधानसभा उमेदवारी लढ़विली दोन वेळा नगरसेवक निवडून आले होते त्यानंतर २०१७ मध्ये वंचित बहुजन आघाडी व भारिप बहुजन महासंघ पक्षाकडून जनतेमधुन नगराध्यक्ष पदाची निवडणूक लढवुन ११ हजार मते घेऊन दुसऱ्या क्रमांक राहिले झालेली अकोला लोकसभा निवडणूकीत पक्षासाठी शिंहाचा वाटा आहे.सै शरीफ राणा यांनी पक्षाच्या माध्यमातून अनेक मोर्चे धरणे आंदोलन काढून जनतेच्या न्याय मिळवुन देण्यासाठी अनेक वेळात जैलात सुध्दा गेले असून तरीही हक्कासाठी सतत लढले त्यांच्या मागे मोठ्या प्रमाणात सुध्दा मुस्लिम समाज जुड़लेला आहे.
अद्याप पर्यंत वंचित बहुजन आघाडी कडून अकोट येथील मुस्लिम समाजाला विधानसभा उमेदवारी देण्यात आली नाही तसेच सै शरीफ राणा यांना अकोट मतदार संघात त्यांची कार्यप्रति ओळख आहे आता सै शरीफ राणा ला एड बाळासाहेब आंबेडकरांनी उमेदवारी दिल्यास तर मोठी टक्कर होऊन निवडून येण्याची शक्यता नकारता येत नाही अशी चर्चा जोमाने होऊ लागली असून सै शरीफ राणा ची वर्णी लागु शकते याकडे वंचित बहुजन आघाडी चे राष्ट्रीय अध्य्क्ष एड प्रकाश उर्फ़ बाळासाहेब आंबेडकर काय भूमिका घेतील याकरिता अकोट विधानसभा मतदार संघाचे लक्ष लागलेले आहेत.
अधिक वाचा : विदर्भाच्या पंढरीत हजारो वारकरी दाखल, शेगाव झाले पंढरपुर
अकोला शी संबंधित सर्व बातम्यांसाठी आम्हाला फेसबुक, ट्विटर, यूट्यूब वर फॉलो करा.
अवर अकोला ला फेसबुक वर लाईक करा – www.facebook.com/OurAkolaMedia
अवर अकोला’च्या यूट्यूब चॅनेलला सबस्क्राईब करा – www.youtube.com/OurMediaNetworks
अवर अकोला ला ट्विटरवर फॉलो करा – https://twitter.com/ourakola
अवर अकोला ला इन्स्टाग्रामवर फॉलो करा – www.instagram.com/OurAkola