शेगाव (प्रतिनिधी) : विदर्भाची पंढरी अशी ओळख असलेल्या शेगावात आषाढी एकादशी उत्सव मोठ्या हर्षोल्लासात साजरा करण्यात येतो. जे भाविक पंढरपूरला जाऊ शकले नाहीत, असे भाविक संत गजानन महाराजांच्या दर्शनासाठी शेगावात गर्दी करतात. आज (ता.१२) जुलै रोजी आषाढी एकादशी असल्याने भाविकांची पाऊले शेगावकडे वळत असून भाविकांच्या मांदियाळीने शेगाव शहर भाविकांनी गजबजून गेले आहे. श्रींच्या चरणी नतमस्तक होण्यासाठी जिल्ह्यातुनच नव्हे तर विदर्भातुन भाविकभक्त शेगावात दाखल झाले आहेत.
आषाढी एकादशी निमित्त आज दुपारी २ वाजता श्रींची पालखी हरिनामाच्या गजरात नगरपरिक्रमेला निघेल. श्रींची पालखी श्री दत्त मंदिर, श्री हरहर मंदिर, श्री शितलनाथ महाराज संस्थान, सावित्रीबाई फुले महिला पतसंस्थेसमोरुन श्रींचे प्रगटस्थळ, श्री मारोती मंदिर, श्री गोरोबा काका मंदिर, लायब्ररी, प्राचीन शिवमंदिर, मातीची गढी, आठवडी बाजार चौक, बसस्थानक, व्यापारपेठ, गांधी चौक, लहुजी वस्ताद चौक या मार्गाने फिरून मंदिरात परत येईल. येथे पूजाअर्चा, आरती होवून आषाढी एकादशी यात्रा महोत्सवाची सांगता होणार आहे.
पंढरपूर येथे शेगाव संस्थानच्या शाखांमध्ये सुध्दा आषाढी एकादशी उत्सव साजरा करण्यात येत आहे. संतनगरीत श्रींचे भक्त, वारकºयांसाठी फराळाची व्यवस्था करतात. श्री लहुजी उस्ताद चौकात भक्तांना, वारकऱ्यांना फराळी खिचडी, उसळचे वाटप करण्यात येत आहे. दरम्यान आषाढी एकादशीचा उत्सव जरी आज पार पडत असला तरी काल पासून शेगाव शहर वारकऱ्यांनी व भक्तांनी गजबजुन गेले होते.
अधिक वाचा : वाडेगाव येथे महाजल योजनेत भ्रष्टाचार,शैलेश मपारी यांचे आमरण उपोषण सुरु
अकोला शी संबंधित सर्व बातम्यांसाठी आम्हाला फेसबुक, ट्विटर, यूट्यूब वर फॉलो करा.
अवर अकोला ला फेसबुक वर लाईक करा – www.facebook.com/OurAkolaMedia
अवर अकोला’च्या यूट्यूब चॅनेलला सबस्क्राईब करा – www.youtube.com/OurMediaNetworks
अवर अकोला ला ट्विटरवर फॉलो करा – https://twitter.com/ourakola
अवर अकोला ला इन्स्टाग्रामवर फॉलो करा – www.instagram.com/OurAkola