बाळापूर (शाम बहुरूपे) : नवी मुंबई व परिसरात घरफोडी व मालमत्ते विषयक गुन्ह्या मध्ये सहभागी असलेला अट्टल गुन्हेगार मोहम्मद दिलशान मेहमूद हसन हा बाळापूर मध्ये रात्री फिरत असल्याची माहिती बाळापूरचे पोलीस निरीक्षक गजानन शेळके ह्यांना मिळाली त्यांनी गस्तीवर असलेल्या PSI जयसिंग पाटील, ह्यांना सदर माहिती दिल्या नंतर त्यांनी शोध घेतला असता नमूद गुन्हेगाराच्या हालचाली संशयास्पद आढळून आल्या नंतर त्याला ताब्यात घेऊन त्याचे बद्दल अधिक माहिती घेतली असता त्याचेवर दिनांक 11-7-2015 रोजी सोनाराला मारहाण करून त्याचे कडून दागिने असलेली बॅग लुटल्याचा गंभीर गुन्हा नोंद असल्याची माहिती मिळाली तसेच नवी मुंबई येथे सुद्धा त्याने बरेच मालमत्ते विषयक गुन्हे केले असल्याची माहिती मिळाली, ह्या बाबत नवी मुंबई च्या NRI पोलीस स्टेशन मध्ये त्याचे विरुद्ध गुन्हे सुद्धा दाखल आहेत, घरफोडी व लूटमार करणारा अट्टल गुन्हेगार बाळापूर पोलिसांनी जेरबंद करण्यात यश प्राप्त केले आहे.
अधिक वाचा : अकोला : अवैध खताचा साठा जप्त ; कृषी विभागाची कारवाई
अकोला शी संबंधित सर्व बातम्यांसाठी आम्हाला फेसबुक, ट्विटर, यूट्यूब वर फॉलो करा.
अवर अकोला ला फेसबुक वर लाईक करा – www.facebook.com/OurAkolaMedia
अवर अकोला’च्या यूट्यूब चॅनेलला सबस्क्राईब करा – www.youtube.com/OurMediaNetworks
अवर अकोला ला ट्विटरवर फॉलो करा – https://twitter.com/ourakola
अवर अकोला ला इन्स्टाग्रामवर फॉलो करा – www.instagram.com/OurAkola
Comments 1