बाळापूर (शाम बहुरूपे) : दि.११ आज शिवसेना बाळापूर शहराच्या वतीने नगरपालिका मुख्यधिकारी श्री पवार साहेब यांना शहरातील मुख्य मार्ग व बस स्थानक वर जाण्याचा मार्गावर, पोलीस स्टेशन रोडवर पडलेल्या खड्ड्या बाबत व निवेदन देण्यात आले मुख्यधिकाऱ्यां सोबत झालेल्या चर्चे दरम्यान उद्या मार्गावरील खड्डे बुजविले जातील असे आश्वासन मुख्यधिकारी व नगर परिषद अभियंता यांनी दिले, जर येत्या दोन दिवसात खड्डे बुजवून पदचाऱ्यांना शाळकरी विद्यार्थ्यांना वाहनचालकांना व गावातील नागरिकांना होत असलेल्या त्रासातून मुक्त करण्यात आले नाही तर शिवसेनेच्या वतीने तीव्र आंदोलन छेडण्यात येईल असा इशारा ही देण्यात आला यावेळी शिवसेना शहरप्रमुख आनंद बनचरे, युवासेना शहरप्रमुख श्याम बहुरूपे, शेलद चे उपसरपंच जितेश अहिर, निर्भयसिंह ठाकूर अफ़रोझ खान पेंटर, गणेश भिसे, रितेश शेलार, राजुसिंह चव्हाण, मोहित चावरीय बाला ठाकूर मनोज खानसरे शुभम जोध, शुभम सोनोने, आकाश वानखडे आदी बहुसंख्य शिवसैनिक उपस्थित होते.
अधिक वाचा : नवी मुंबई पोलिसांना वॉन्टेड असलेला अट्टल गुन्हेगार बाळापूर पोलिसांच्या जाळ्यात
अकोला शी संबंधित सर्व बातम्यांसाठी आम्हाला फेसबुक, ट्विटर, यूट्यूब वर फॉलो करा.
अवर अकोला ला फेसबुक वर लाईक करा – www.facebook.com/OurAkolaMedia
अवर अकोला’च्या यूट्यूब चॅनेलला सबस्क्राईब करा – www.youtube.com/OurMediaNetworks
अवर अकोला ला ट्विटरवर फॉलो करा – https://twitter.com/ourakola
अवर अकोला ला इन्स्टाग्रामवर फॉलो करा – www.instagram.com/OurAkola