अकोट(प्रतिनिधी)– अकोट तालुक्यातील देवरीफाटा नजीकच्या आलेवाडी येथे गाडीत गुदमरुन एका बालकाचा दुदैवी मृत्यू झाल्याची घटना ४ जुनच्या रात्री उघडकीस आली. मृत्यू झालेला बालक हा कचरा प्लॅस्टिक पिशव्या वेचण्याकरीता आलेवाडीत आला होता.
दहीहांडा पोलिस स्टेशन अंतर्गत येत असलेल्या आलेवाडी येथे काटेरी झुडपात एम एच ४३एन ९९११ क्रमांकाची ओपेरा चारचाकी गाडी उभी होती. या गाडीचा दरवाजा उघडून तानेश विष्णु बल्लाळ (अण्णाभाऊ साठे नगर अकोट फाईल अकोला) हा गाडीत बसला. गाडीचे दरवाजे आतमधुन बंद झाल्याने बालकाचा गूदमरून मृत्यू झाल्याची प्राथमिक माहीती आहे. हा बालक आपल्या आजी व मावशी सोबत प्लॅस्टिक कचरा वेचण्याकरीता आलेवाडी गावात आला होता. दुपारी खुपच ऊन्ह असल्याने या गाडीत तो बसण्याकरीता गेला असल्याचा तर्क काढण्यात येत आहे. गाडीचे मालक नागेश कराळे यांनी ही गाडी दोन वर्षापासून बंद अवस्थेत उभी असल्याचे पोलिसांना सांगितले. या घटनेची चौकशी व पुढील तपास दहीहंडा पोलीस करीत आहेत.
अधिक वाचा : वाडेगावातील ६० वर्षीय शेतमजुराची आत्महत्या
अकोला शी संबंधित सर्व बातम्यांसाठी आम्हाला फेसबुक, ट्विटर, यूट्यूब वर फॉलो करा.
अवर अकोला ला फेसबुक वर लाईक करा – www.facebook.com/OurAkolaMedia
अवर अकोला’च्या यूट्यूब चॅनेलला सबस्क्राईब करा – www.youtube.com/OurMediaNetworks
अवर अकोला ला ट्विटरवर फॉलो करा – https://twitter.com/ourakola
अवर अकोला ला इन्स्टाग्रामवर फॉलो करा – www.instagram.com/OurAkola