अकोला (प्रतिनिधी) : येत्या लोकसभा निवडणूकीमध्ये मतदारांचा मोठया प्रमाणात सहभाग वाढविण्याच्या दृष्टीने मा. भारत निवडणूक आयोगाने मतदार जागृती अभियान(SVEEP) हा कार्यक्रम कार्यान्वीत केला आहे. त्या अंतर्गत जिल्हयातील सर्व शाळांमध्ये मतदार साक्षरता मंडळे (ELC) स्थापीत करुन त्याद्वारे मतदार जागृती करिता विविध उपक्रमांचे आयोजन करण्यात येत आहे.
त्याअनुषगाने जिल्हाधिकारी यांनी सर्व माध्यमीक शाळांतील इ. ५ वी ते ९ वी व ११ वी च्या विद्यार्थ्यांच्या सहभागातून ‘आई-बाबांस पत्र’ या उपक्रमाचे आयोजन करण्याबाबत पत्राद्वारे मुख्याध्यापकांना सूचीत केले आहे. या पत्रासोबत सहपत्रांकित आशयाचे पत्र शाळेच्या माध्यमानुसार भाषांतरीत करुन विद्यार्थ्यांनी आपल्या कल्पकतेतून शाळेमध्ये सामुहीकरित्या लिहावयाचे आहे. सदर पत्र विद्यार्थ्यांनी लिगल साईजच्या रेषांच्या पानावर निळया शाईच्या पेनने लिहावयाचे आहे. विद्यार्थ्यांनी आपल्या कल्पकतेतून स्वत: वेगळया पध्दतीने लिहीलेल्या उत्कृष्ट पत्रांची निवड करण्यात येणार आहे. या उपक्रमात सहभागी होणा-या काही निवडक शाळांमध्ये जिल्हाधिकारी व्यक्तीश: भेट देणार आहेत. त्यादृष्टीने शाळांनी शैक्षणिक गुणवत्ता विकास कक्ष, जिल्हाधिकारी कार्यालय, अकोला येथे लेखी स्वरुपात कळवावयाचे आहे.
२२ मार्च ते ३० मार्च २०१९ या कालावधीत हा उपक्रम राबवून त्याबाबतचा अहवाल [email protected] या ई-मेलव्दारे पाठवायचा आहे. शाळेतील कल्पकतापूर्वक व उत्कृष्ट अशी दोन पत्रे शैक्षणिक गुणवत्ता विकास कक्ष,जिल्हाधिकारी कार्यालय, अकोला येथे ३१ मार्च २०१९ पर्यत हस्तपोच / पोष्टाद्वारे पाठवावेत. निवडक उत्कृष्ट पत्रांना बक्षिसे देण्यात येणार आहेत. असे प्रकाश अंधारे, समन्वयक तथा सहा. नोडल अधिकारी SVEEP कार्यक्रम यांनी कळविले आहे.
अधिक वाचा : भावना गवळी अन ठाकरेंशी लढायला प्रहारची उमेदवारी आत्महत्याग्रस्त शेतकऱ्याच्या पत्नीला
अकोला शी संबंधित सर्व बातम्यांसाठी आम्हाला फेसबुक, ट्विटर, यूट्यूब वर फॉलो करा.
अवर अकोला ला फेसबुक वर लाईक करा – www.facebook.com/OurAkolaMedia
अवर अकोला’च्या यूट्यूब चॅनेलला सबस्क्राईब करा – www.youtube.com/OurMediaNetworks
अवर अकोला ला ट्विटरवर फॉलो करा – https://twitter.com/ourakola
अवर अकोला ला इन्स्टाग्रामवर फॉलो करा – www.instagram.com/OurAkola