यवतमाळ (प्रतिनिधी) : जिने पतीच्या आत्महत्येनंतर खचून न जाता नेटाने संसार चालवला त्या वैशाली येडे या महिलेला यवतमाळ येथून लोकसभा रिंगणात उतरविण्याचा निर्णय आमदार बच्चू कडू यांनी जाहीर केला.
सरकारविरुद्ध अनोख्या पद्धतीने आंदोलने करून आपल्या मागण्या मान्य करून घेणारे अपक्ष आमदार आणि प्रहार संघटनेचे अध्यक्ष बच्चू कडू यांनी लोकसभा निवडणुकीत आत्महत्या ग्रस्त कुटुंबातील वैशाली येडे यांना यवतमाळमधून लोकसभेची उमेदवारी देण्याचा निर्णय घेतला आहे.
यवतमाळमध्ये झालेल्या ९२व्या अखिल भारतीय मराठी साहित्य संमेलनात शेतकरी विधवा महिलांचे आणि सारस्वतांच्या समस्या निर्धास्तपणे मांडणाऱ्या वैशाली येडे यांचे नाव चर्चेत आहे. यासाठी संघटनेतील पदाधिकाऱ्यांचे एकमत झाले आहे. परंतु वैशाली येडे यांच्याकडून या संदर्भात अद्याप होकार कळविण्यात आलेला नाही.
महाराष्ट्रातील सर्वाधिक शेतकरी आत्महत्या यवतमाळ जिल्ह्यात झाल्या आहेत. याच जिल्ह्यात ९२ वे अखिल भारतीय मराठी साहित्य संमेलन घेण्यात आले होते. त्यावेळी शेतकरी महिला वैशाली येडे यांनी उद्घाटक म्हणून शेतकरी समस्या आणि शेतकरी विधवा महिलांच्या समस्या मांडल्या होत्या.
अधिक वाचा : अकोल्यात विविधरंगी माठ विक्रीसाठी दाखल
अकोला शी संबंधित सर्व बातम्यांसाठी आम्हाला फेसबुक, ट्विटर, यूट्यूब वर फॉलो करा.
अवर अकोला ला फेसबुक वर लाईक करा – www.facebook.com/OurAkolaMedia
अवर अकोला’च्या यूट्यूब चॅनेलला सबस्क्राईब करा – www.youtube.com/OurMediaNetworks
अवर अकोला ला ट्विटरवर फॉलो करा – https://twitter.com/ourakola
अवर अकोला ला इन्स्टाग्रामवर फॉलो करा – www.instagram.com/OurAkola