अकोट (प्रतिनिधी) : अकोट येथे सोमवारी पोलिसांच्या डी.बी. पथकाने टाकलेल्या धाडीत धारोळी वेस भागातून २२ हजार रूपयांचा प्रतिबंधत गुटखा जप्त करण्यात आला. अकोट शहर पोलीस निरीक्षक संतोष महल्ले यांच्या मार्गदर्शनाखाली डी.बी.पथकाने धारोळी वेस येथे ११ मार्च रोजी धाड टाकली. या धाडीत ११ हजार ५०० रूपये किंमतीचा पानमसाला व १० हजार ८८० रूपये किमतीचे गुटख्याचे ६८ पाकीट टेकडीपुरा येथील मो.मुजाईद अब्दुल सादीक याला मुद्देमालासह पोलिसांनी ताब्यात घेतले आहे.
कारवाई डी.बी .पथकाचे संजय घायल, गुड्ड पठान, विजय सोळंके, गोपाल अघडते यांनी केली. अकोट शहरात मोठया प्रमाणात गुटख्याची साठवणूक केली जाते. या ठिकाणावरून हा गुटखा जिल्ह्यात इतरत्र ठिकाणी पाठविण्यात येत असल्याची चर्चा सुरू आहे.
अधिक वाचा : घातक हत्यारा सह सराईत गुन्हेगार अटक, बाळापूर पोलिसांची कामगिरी !
अकोला शी संबंधित सर्व बातम्यांसाठी आम्हाला फेसबुक, ट्विटर, यूट्यूब वर फॉलो करा.
अवर अकोला ला फेसबुक वर लाईक करा – www.facebook.com/OurAkolaMedia
अवर अकोला’च्या यूट्यूब चॅनेलला सबस्क्राईब करा – www.youtube.com/OurMediaNetworks
अवर अकोला ला ट्विटरवर फॉलो करा – https://twitter.com/ourakola
अवर अकोला ला इन्स्टाग्रामवर फॉलो करा – www.instagram.com/OurAkola