अकोला (प्रतिनिधी) : बाळापूर शहरातील गाजीपुर भागात रहात असलेला व चोरीचे गुन्हे दाखल असलेला सराईत गुन्हेगार संतोष गावंडे उर्फ अब्दुल राजीक अब्दुल रौफ वय 24 वर्ष ह्याचे जवळ घातक हत्यार असून तो शहराचे बाहेर असलेल्या चिंचपेड कडे जात असल्याची खात्रीलायक माहिती बाळापूरचे पोलीस निरीक्षक गजानन शेळके, व सहाय्यक पोलीस उपनिरीक्षक सुरेंद्र जोशी ह्यांना मिळाल्या वरून पोलीस उपनिरीक्षक विठ्ठल वाणी, सहाय्यक पोलिस उपनिरीक्षक सुरेंद्र जोशी, कॉन्स्टेबल हर्षल श्रीवास ह्यांनी धाव घेऊन खात्री केली असता संतोष गावंडे हा जातांना दिसला, त्याची पंचा समक्ष झडती घेतली असता त्याचे ताब्यातून एक गुप्ती आढळून आल्याने त्याला अटक करून गुप्ती जप्त करून त्याचे विरुद्ध आर्म ऍक्ट प्रमाणे गुन्हा दाखल करण्यात आला असून पुढील तपास पोलिस निरीक्षक गजानन शेळके ह्यांचे मार्गदर्शनाखाली सहाय्यक पोलीस उपनिरीक्षक सुरेंद्र जोशी करीत आहेत.
अधिक वाचा : धान्य चोरणाऱ्या टोळी कडून आणखी एक गुन्हा उघड, बाळापूर पोलिसांची कामगिरी
अकोला शी संबंधित सर्व बातम्यांसाठी आम्हाला फेसबुक, ट्विटर, यूट्यूब वर फॉलो करा.
अवर अकोला ला फेसबुक वर लाईक करा – www.facebook.com/OurAkolaMedia
अवर अकोला’च्या यूट्यूब चॅनेलला सबस्क्राईब करा – www.youtube.com/OurMediaNetworks
अवर अकोला ला ट्विटरवर फॉलो करा – https://twitter.com/ourakola
अवर अकोला ला इन्स्टाग्रामवर फॉलो करा – www.instagram.com/OurAkola