अकोला (प्रतिनिधी): भारत निवडणूक आयोगाने दि. 10 मार्च 2019 रोजी लोकसभा सार्वत्रिक निवडणुकीचा कार्यक्रम जाहीर केला आहे. कार्यक्रम जाहीर झाल्यापासूनच लोकसभा निवडणुकीची आदर्श आचारसंहिता लागू झाली आहे. सर्व शासकीय विभाग व निवडणुकीसाठी नियुक्त नोडल अधिकाऱ्यांनी जिल्ह्यात आदर्श आचारसंहितेची काटेकोरपणे अंमलबजावणी करण्याच्या सूचना जिल्हाधिकारी तथा जिल्हा निवडणूक अधिकारी जितेंद्र पापळकर यांनी आज दिल्या. आदर्श आचारसंहिता अंमलबजावणीविषयी जिल्हाधिकारी कार्यालयाच्या नियोजन सभागृहात आयोजित बैठकीत ते बोलत होते.
यावेळी जिल्हा परिषदेचे मुख्य कार्यकारी अधिकारी आयुष प्रसाद, मनपा आयुक्त संजय कापडणीस अपर जिल्हाधिकारी नरेंद्र लोणकर, उपजिल्हा निवडणुक अधिकारी राजेश खवले, निवासी उपजिल्हाधिकारी राम लठाड, यांच्यासह विविध शासकीय विभागांचे प्रमुख व निवडणूक विषयक नोडल अधिकारी उपस्थित होते.
जिल्हाधिकारी म्हणाले की, भारत निवडणूक आयोगाने जाहीर केलेल्या तारखांनुसार अकोला मतदारसंघातील मतदान १८ एप्रिल २०१९ रोजी होणार आहे. जिल्ह्यात आदर्श आचारसंहितेची काटेकोर अंमलबजावणी करण्यासाठी सर्व शासकीय यंत्रणांनी सतर्क रहावे. आदर्श आचारसंहिता कालावधीत शासकीय वाहन, शासकीय कार्यालये अथवा कोणत्याही शासकीय इमारतीचा राजकीय कारणासाठी वापर केला जाणार नाही, याची दक्षता घ्यावी. सार्वजनिक ठिकाणी लावण्यात आलेले विविध राजकीय जाहिरात फलक, मजकूर व झेंडे काढून घेण्याची कार्यवाही महानगर पालिका, सर्व नगरपरिषदा व स्थानिक स्वराज्य संस्थांनी पूर्ण करून त्याचा अहवाल जिल्हा निवडणूक कार्यालयाला सादर करावा.
आदर्श आचारसंहितेचा भंग होईल अशी कृती कोणत्याही शासकीय विभागाकडून होता कामा नये. निवडणूक कामकाजात कोणत्याही प्रकारचा हलगर्जीपणा करू नका. आदर्श आचारसंहितेच्या अंमलबजावणीविषयी कोणत्याही स्वरूपाच्या शंका असल्यास संबंधित शासकीय विभागांनी जिल्हाधिकारी कार्यालयाशी संपर्क साधून शंकांचे निरसन करून घ्यावे, असे आवाहनही जिल्हाधिकाऱ्यांनी यावेळी केले.
अधिक वाचा : तेल्हारा हत्याकांड प्रकरणी चोवीस तासात होणार चित्र स्पष्ट !
अकोला शी संबंधित सर्व बातम्यांसाठी आम्हाला फेसबुक, ट्विटर, यूट्यूब वर फॉलो करा.
अवर अकोला ला फेसबुक वर लाईक करा – www.facebook.com/OurAkolaMedia
अवर अकोला’च्या यूट्यूब चॅनेलला सबस्क्राईब करा – www.youtube.com/OurMediaNetworks
अवर अकोला ला ट्विटरवर फॉलो करा – https://twitter.com/ourakola
अवर अकोला ला इन्स्टाग्रामवर फॉलो करा – www.instagram.com/OurAkola