तेल्हारा (प्रतिनिधी)- उद्या दि. १० मार्च रविवार रोजी सकल मराठा फाऊंडेशन तेल्हारा व ओझोन मल्टिस्पेशालिस्ट हॉस्पिटल अकोला यांच्या संयुक्त विद्यमानाने निशुल्क भव्य रोग निदान शिबिराचे आयोजन करण्यात आले आहे.
सकल मराठा फाऊंडेशन तेल्हारा तालुका व ओझोन मल्टिस्पेशालिस्ट हॉस्पिटल अकोला व समस्त मित्रपरिवार तेल्हारा यांच्या संयुक्त विद्यमानाने आज दि. १० रोजी स्थानिक सेठ बंसीधर विद्यालय तेल्हारा येथे सकाळी १० ते दुपारी २ वाजेपर्यंत मोफत व निशुल्क भव्य रोग निदान शिबिराचे आयोजन करण्यात आले आहे या शिबिरासाठी अकोला येथील सुप्रसिद्ध डॉक्टरची टीम येणार आहे या रोग निदान शिबिरात ओझोन हॉस्पिटलचे चेअरमन डॉ.विनित हिंगणकर प्रामुख्याने उपस्थित राहणार असून
१) डॉ.शुभांगी बोराखडे व
२) डॉ.गुरुदासानी नेत्ररोग तज्ञ,
३) डॉ.सचिन मुरारका अस्तिरोग तज्ञ,
४) डॉ.शिरीष आंबेकर, हृदयरोग तज्ञ,
५) डॉ.पराग डोईफोडे नाक कान घसा तज्ञ
६) डॉ.आशिष गिर्हे जनरल फिजिशियन व
७) डॉ. तिवारी दंतरोग तज्ञ
इत्यादी डॉक्टरांची प्रमुख उपस्थित राहणार आहे. या निशुल्क शिबिराचा तालुक्यातील व शहरातील जास्तीत जास्त संख्येने नागरिकांनी उपभोग घ्यायचा आहे अशे आहावण आयोजक सकल मराठा फाऊंडेशन तेल्हारा तालुका व समस्त मित्रपरिवाराच्या वतीने करण्यात आले आहे.