तेल्हारा(प्रतिनिधी)– तालुक्यातील ग्राम आडसुळ येथे दि २७ रोजी एका युवकाला सहा जणांनी जीवे मारण्याचा पर्यन्त केला यामध्ये युवक गंभीर जखमी झाल्याने त्याच्यावर अकोला येथे उपचार सुरू आहेत.
ग्राम आडसुळ येथे दि २७ फेब्रुवारी रोजी सायंकाळी सहा वाजेच्या दरम्यान नितीन गणेश मानकर हा येथील एका हेअर सलून मध्ये बसलेला असतांना आडसुळ येथील सहा जणांनि त्याच्यावर जुन्या भांडणावरून वाद घालून लोखंडी रॉड ,पाईप,फावडे अशा प्रकारच्या हत्यारांनि त्याच्यावर हल्ला चढवून त्याला गंभीररित्या जखमी केले यावेळी गावातील नागरिकांनी मध्यस्ती करून त्याला उपचारासाठी अकोला येथे हलवण्यात आले याप्रकरणी काल रात्री तेल्हारा पोलीस ठाण्यात आरोपी राजेश तायडे,रवी तायडे,अमोल तायडे,स्वप्नील तायडे,तेजराव तायडे,प्रकाश तायडे सर्व रा आडसुळ यांच्याविरुद्ध कलम ३०७,१४३,१४७,१४८,१४९,५०६ नुसार गुन्हा दाखल करण्यात आला असून आरोपीना अद्याप अटक करण्यात आली नाही.
या प्रकरणाचा तपास ठाणेदार विकास देवरे यांच्या नेतृत्वाखाली पोलीस उपनिरीक्षक निलेश देशमुख हे करीत आहेत.
अधिक वाचा : दारू अड्ड्यावर पोलिसांची छापेमारी, सात जणांविरुद्ध गुन्हा दाखल
अकोला शी संबंधित सर्व बातम्यांसाठी आम्हाला फेसबुक, ट्विटर, यूट्यूब वर फॉलो करा.
अवर अकोला ला फेसबुक वर लाईक करा – www.facebook.com/OurAkolaMedia
अवर अकोला’च्या यूट्यूब चॅनेलला सबस्क्राईब करा – www.youtube.com/OurMediaNetworks
अवर अकोला ला ट्विटरवर फॉलो करा – https://twitter.com/ourakola
अवर अकोला ला इन्स्टाग्रामवर फॉलो करा – www.instagram.com/OurAkola