तेल्हारा (प्रतिनिधी) : तेल्हारा ते अडसूळ मार्ग हा तालुक्यातील सर्वात जास्त वाहतुकीचा मार्ग असून रस्त्याची अवस्था अत्यंत दयनीय झाली असुन रस्त्यात खड्डे की खड्यात रस्ता हे समजेनासे झाले, सदर रस्त्यावरून मौजे तळेगाव, वरुड वडणेर, मनातरी, अडसूळ, दहिगाव, निंभोरा, पंचगव्हान, भांबेरी, थार, या गावातील हजारो नागरिक, शाळकरी विद्यार्थी दररोज ये जा करतात. रस्ता खड्डेमय असल्यामुळे प्रवास्याना नाहक त्रास सहन करावा लागत आहे. हा रस्ता दुरुस्त झाला नाही तर भविष्यात मोठा अपघात होण्याची भीती आहे, म्हणून किरण पाटिल अवताडे यांच्या नेतृत्वात सार्वजनिक बांधकाम मुख्य अभियंता अकोला यांना निवेदन देण्यात आले.
त्वरीत रस्त्याचे काम सुरू करावे नाहीतर चक्का जाम आंदोलन छेडण्याचा इशारा किरण पाटील अवताडे यांनी सदर निवेदनात दिला. निवेदन देते वेळी वैभव राऊत, प्रमोद राऊत, संदीप बुटे, योगेश राऊत, रुपेश राऊत, शाम राऊत, प्रवीण राऊत, राहुल रोठे, पंकज अघडते, सुमित बोरसे, मंगेश रोठे, राहुल वाघमारे, नागेश वाघमारे, राहुल बोडखे, अलकेश रोठे, विजय नवलकर, विठ्ठल हिवसे, बाळूभाऊ महल्ले, श्रीधर महल्ले, राहुल भोम, सुधिर भारसाकळे, शैलेश रत्नपारखी, पवन वानखडे, अंगद तिहीले, सागर फोकमारे, स्वप्निल फोकमारे, मनीष फोकमारे, गणेश गावंडे, सचिन हेरोळे, गणेश दही, कृष्णा दही, मनोज नागे, विठ्ठल दही, शिवा दही, रोशन खोटरे, गौरव मार्के, संदीप मार्के, कृष्णा मार्के, निळू मार्के,अक्षय ताथोड, सोपान ताथोड, एकनाथ सु. ताथोड, राम अवताडे, रवी काकड, शशी बोरसे, राहुल घंगाळ, भैय्या अवताडे, हर्षल अवताडे, निखिल अवताडे, यांच्यासह बरेच गावकरी उपस्थित होते.
अधिक वाचा : कुणबी समाज संघटनेने दिले शेतकऱ्यांसंदर्भात मुख्यमंत्र्यांना निवेदन
अकोला शी संबंधित सर्व बातम्यांसाठी आम्हाला फेसबुक, ट्विटर, यूट्यूब वर फॉलो करा.
अवर अकोला ला फेसबुक वर लाईक करा – www.facebook.com/OurAkolaMedia
अवर अकोला’च्या यूट्यूब चॅनेलला सबस्क्राईब करा – www.youtube.com/OurMediaNetworks
अवर अकोला ला ट्विटरवर फॉलो करा – https://twitter.com/ourakola
अवर अकोला ला इन्स्टाग्रामवर फॉलो करा – www.instagram.com/OurAkola