तेल्हारा (प्रतिनिधी) – प्रधानमंत्री सन्मान योजनेचा सर्व शेतकऱ्याना सरसकट लाभ मिळणे तसेच अर्थ सहाय्यात वाढ करणे बाबत कुणबी युवक संघटना तेल्हारा तालुक्याच्या वतीने दि.१४/२/२०१९ रोजी महसूल विभाग नायब तहसीलदार विजय सुरळकर यांच्या मार्फत मुख्यमंत्री यांना निवेदन देण्यात आले.
या निवेदनात ह्या वर्षीच्या केंद्रीय अर्थ संकल्पात अल्प व अत्यल्प भूधारक शेतकऱ्यांसाठी दरवर्षी ६०००(सहा हजार )अर्थ सहाय्य शासनाकडून जाहीर केले आहे परंतु केवळ दोन हेक्टर पर्यंत शेती असणाऱ्या शेतकऱ्यांनाच याचा लाभ मिळनार असे जाहीर केले आहे .यामूळे ज्या शेतकऱ्यांच्या सात बारा मधे २हेक्टर १आर जरी क्षेत्र असेल तर तो शेतकरी या लाभापासून वंचित राहणार आहे. तरी सध्याची परिस्थिती लक्षात घेता महाराष्ट्रात जास्तीत जास्त शेती ही कोरडवाहू क्षेत्राखालि येत असल्याने बऱ्यापैकी शेतकरी हे निसर्गावर अवलंबून आहेत आणि मागील वर्षी पावसाचे प्रमाण अत्यल्प असल्याने संपूर्ण महाराष्ट्र राज्यातील शेतकऱ्यांना याचा फटका बसला पर्यायी दुष्काळग्रस्त परिस्थिती निर्माण झाली व शेतकरी आत्महत्येकडे वळला असून ह्या दुष्काळग्रस्त शेतकऱ्यांच्या बाबतीत असा दूजाभाव न करता सर्व शेतकऱ्यांना सरसकट अर्थसहाय्य देण्यात यावे व अर्थ सहाय्याची रक्कम वाढवून देण्यात यावी .
अशा आशयाच्या निवेदनावर संघटना अध्यक्ष पुरुषोत्तम ग.इंगोले, विशाल नांदोकार, ता.प्र.प्र., बंटी राऊत ता.कार्याध्यक्ष, शहर अध्यक्ष स्वप्नील सुरे, कार्याध्यक्ष किशोर डांबरे,रामभाऊ फाटकर, निलेश जवकार ,संदीप खारोडे, गजानन गायकवाड, वैभव गावंडे, राजेश काटे, स्वप्नील तायडे, विक्की खोटरे, विठ्ठल राऊत, हर्षल दिघे इत्यादी सह अनेक कार्यकर्त्यांच्या सह्या आहेत .
अधिक वाचा : आरक्षण वगळण्याबाबत शहरातील नागरिकांसह नगरसेवकांचे मुख्याधिकाऱ्यांना निवेदन
अकोला शी संबंधित सर्व बातम्यांसाठी आम्हाला फेसबुक, ट्विटर, यूट्यूब वर फॉलो करा.
अवर अकोला ला फेसबुक वर लाईक करा – www.facebook.com/OurAkolaMedia
अवर अकोला’च्या यूट्यूब चॅनेलला सबस्क्राईब करा – www.youtube.com/OurMediaNetworks
अवर अकोला ला ट्विटरवर फॉलो करा – https://twitter.com/ourakola
अवर अकोला ला इन्स्टाग्रामवर फॉलो करा – www.instagram.com/OurAkola