बेलखेड (चंद्रकांत बेदरकार): दिनांक 14/2/2019 रोजी काश्मीरमधील श्रीनगर वरून 20 कि.मी. अंतरावर अवंतीपोरा येथे राष्ट्रीय महामार्गावर पुलवामा जिल्ह्यात दहशतवादी संघटनेने घडवून आणलेल्या भ्याड हल्ल्या विरोधात सीआरपीएफचे 42 जवान शहीद झाले. या हल्ल्याची जबाबदारी आतंकवादी संघटना जयेश-ए-मोहम्मदने स्वीकारली असून त्याविरोधात बेलखेड येथील नागरिकांनी सावित्रीबाई फुले कन्या विद्यालय ते गजानन महाराज मंदिर पर्यन्त कॅन्डल मार्च काढला असून, गावातील सर्वच नागरिक दुकाने बंद ठेऊन सहभागी झाले व अतिरेकी संघटना व पाकिस्तानच्या विरोधात जाहीर निषेध व्यक्त केला.